कोपरगाव - संत जगनाडे महाराजांनी संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानले होते. संत जगनाडे महाराज जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या मूळ गाथेचे लेखनकर्ते व चौदा टाळकऱ्यांपैकी एक विश्वासू टाळकरी होते. संत जगनाडे महाराजांनी तुकाराम महाराजांच्या साहित्याचा अनमोल साठा जगाला दिला असल्याचे प्रतिपादन साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव येथे संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्यापारी धर्मशाळेत आयोजित कार्यक्रमप्रसंगी संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन केले. ते म्हणाले, तेली समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असून संत जगनाडे महाराज मंदिराच्या सभामंडपासाठी १० लाख रुपये निधी दिला असून लवकरच या कामास प्रारंभ होणार आहे. भविष्यात देखील निधीची गरज भासल्यास निधी देऊ, अशी ग्वाही दिली. यावेळी काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, धरमचंद बागरेचा, सुनील गंगुले, नगरसेवक मंदार पहाडे, सुनील शिलेदार, रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, डॉ. तुषार गलांडे, राहुल देवळालीकर, जावेद शेख, संदीप कपिले, धनंजय हार, वाल्मिक लहिरे, मनोज नरोडे, राहुल राठोड, शिवाजी लकारे, प्रमोद गव्हाणे, विलास वालझाडे, रामदास गायकवाड, युवराज सोनवणे, राजेंद्र राऊत, राजेंद्र व्यवहारे, संतोष शेलार, विजय खडांगळे, निलेश धारक, ज्ञानेश्वर लोखंडे, सागर सोमवंशी, चेतन सोमवंशी, राजेश वलझाडे, बाळासाहेब राऊत, अनिल दुधे, ज्ञानेश्वर महापुरे, गोविंद सोनवणे, प्रमोद कवाडे, सुरेश सोनवणे, राजेंद्र राऊत, अंकुश महाले आदींसह तेली समाज बांधव व नागरिक करोनाचे नियम पाळून उपस्थित होते.