दि.1 वैजापूर जि.औरंगाबाद - श्री.संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा निमित्त विनम्र अभिवादन व कार्यक्रमांचे आयोजन शिवराई रोड, वैजापूर येथे करण्यात आले. ह. भ. प. श्री. प्रकाश महाराज कदम यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.यानंतर ह. भ. प. श्री. ज्ञानेश्वर महाराज मधाने (शिवुर) यांचे सुश्राव्य प्रवचन झाले. यानंतर दोन्ही महाराजांचे पुजन श्री. विलास गोपीनाथ भुजबळ व सौ. शोभाताई भुजबळ, श्री. सिताराम तुकाराम व्यवहारे व सौ. लक्ष्मीबाई व्यवहारे, श्री. अरूण आसाराम आंबेकर व सौ. भारती आंबेकर, श्री. अशोक साळुंके सर व सौ. सरला साळुंके या दाम्पत्यांनी केले. यांनतर श्री.संताजी महाराजांची महाआरती झाली.
श्री. संत संताजी युवा संघटना वैजापूर यांच्या दिनदर्शिका प्रकाशन महाराजांच्या, समस्त विश्वस्त मंडळ तिळवण तेली समाज वैजापूर, तेलीघाणी उत्पादन सहकारी संस्था मर्या. वैजापूर, श्री.संत संताजी युवा संघटना वैजापूर चे सर्व अग्रणी सदस्य, समाजातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
वैजापूर शहराच्या नगरअध्यक्षा श्रीम.शिल्पाताई दिनेश परदेशी यांनी श्री.संताजी महाराजांचे प्रतिमा पुजन केले.
समाजातील 1 ली ते 5 वीच्या विद्यार्थींना शैक्षणिक साहित्य किट वाटप करण्यात आले.
यावेळी समाजातील जेष्ठ नागरिक श्री. सिताराम व्यवहारे, श्री. केशव आंबेकर, श्री. पंढरीनाथ शेलार, श्री. रामदास रत्नपारखी सर, श्री. रघुनाथ क्षीरसागर, श्री. नारायण लुटे, श्री. अरूण आंबेकर, श्री. बबन क्षीरसागर, श्री. जगदीश पवार, श्री. एकनाथ फल्ले श्री. गोकुळ भुजबळ श्री. सुंदरलाल राऊत, श्री. बाळु पवार,श्री. सुभाष आंबेकर, श्री. कमलेश आंबेकर श्री. दत्ता रोजेकर श्री. राजेंद्र पवार, श्री. सुनिल भुजबळ सर,श्री रामहरीभाऊ राजमाने तसेच श्री. संत संताजी युवा संघटना वैजापूर चे सदस्य श्री. ज्ञानेश्वर शेलार, श्री. अशोक साळुंके सर, श्री. गणेश सोनवणे, श्री. प्रविण धामणे, श्री. प्रमोद राऊत, श्री. शिवकुमार भुजबळ, श्री. शशिकांत फल्ले, श्री. राजेंद्र महापूरे, श्री. विलास महापूरे, श्री. संतोष फल्ले, श्री. प्रशांत शेलार, श्री. सागर महापूरे, श्री. रामेश्वर मिटकर, श्री. मंगेश सोनवणे, श्री. संदेश क्षिरसागर, श्री. प्रशांत क्षिरसागर, श्री. सचिन खंडागळे, श्री. विनायक व्यवहारे, श्री. जितु पवार, श्री. पप्पु क्षीरसागर श्री.सचिन रत्नपारखी, श्री. प्रकाश शेलार, श्री. विशाल देवकर, श्री. सचिन राऊत श्री. धनजंय उचीत, श्री. योगेश पवार, श्री. रामेश्वर सोनवणे, श्री. कृष्णा क्षीरसागर श्री. संतोष सोनवणे तसेच समस्त तिळवण तेली समाज व इतर समाज बांधवांची बहुसंख्य उपस्थिती होती.