परभणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आयोजित संत श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या रथयात्रेचे नांदेड विभागीय सचिव पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडेश्वर ग्रामस्थांच्या वतीने ढोल ताश्या , फटाके फोडून व महिला मंडळींच्या वतीने दीपोत्सव साजरा करून स्वागत केले. यावेळी दि.२२ डिसेंबर रोजी सकाळी ९-०० ते १००० श्री भीमाशंकर गुरुजी यांचे प्रवचन आयोजित केले होते, रथयात्रा स्वागत प्रसंगी गडगा मठाचे उत्तराधिकारी श्री शिवहार महाराज, महासभे चे कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार, राज्य समन्वयक सुनील चौधरी, राज्य युवा महासचिव नरेंद्र चौधरी, विभाग प्रमुख डॉ. रावसाहेब राऊत, श्रीकृष्ण ढोबळे, श्री ह भ प भीमाशंकर गुरुजी, श्री ह भ प जगन्नाथ गुरुजी, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष रितेश काळे, रवी सोनवणे, विठ्ठल रणबावरे, गजानन काळे, ओंकार स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ शिवदास शिंदे, मच्छिंद्रनाथ शिंदे, मधुकर शिंदे, नारायणराव साखरे साहेब , मुकुंद शिंदे, विलसराव काळे, नारायणराव काळे समवेत समस्त गावकरी मंडळींनी परिश्रम घेतले तर या कार्यक्रमाचे सूत्र संचलन उद्धव शिंदे यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री सुधीर सोनूनकर यांनी मानले अशी माहिती नांदेड विभागाचे विभागीय प्रसिद्धीप्रमुख यांनी दिली.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade