नगर - श्री संत संताजी जगनाडे महाराज यांनी जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची बुडालेली गाथाचे स्मरण करुन पुन्हा लेखन केले.अभंग व गाथा अमर केली.संताजी महाराजांचे देहावसन झाले असता. श्री संत तुकाराम महाराजांनी दिले वचन पाळुन पृथ्वीवर पुन्हा वैकुंठातून आगमन केले.व त्यांना मुठमाती दिली. असे गुरु शिष्याचे श्रेष्ठ नाते होते.
कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात अंत्यविधी करणे अत्यंत कठीण झाले होते.मयताचे नातेवाईक ही अंत्यसंस्कार करण्यास येत नव्हते. या काळात अमरधाम येथे स्वप्नील कुर्हे व संकेत कुर्हे यांचे सहकारी यांनी अंत्यविधीचे पविञ कार्य करून नगर शहरात माणुसकीचे दर्शन घडविले आहे. समाजात भितीचे वातावरण पसरले असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून श्री कुर्हे बंधु यांनी अंत्यविधी करण्याचे काम चालु ठेवले. जिल्हातील व महानगर शहरातील अंत्यविधीची संख्या शेकडोच्या प्रमाणात होत असल्याने कुर्हे बंधुनी दिवसराञ कठोर परिश्रम घेवुन सावेडी उपनगरातही व्यवस्था केली. त्यांच्या महान कार्याची समाजाने दखल घेणे गरजेचे आहे. म्हणून तेली समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. अंत्यविधीचे पविञ कार्य करुन कुर्हे परिवाराने माणुसकीचे दर्शन घडविले आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे नाशिक विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी केले.