चंद्रपूर - तेली समाज संघटनात्मदृष्ट्या मोठा आहे. त्यामुळे तेली समाजबांधव सद्धा मोठा झाला पाहिजे. समाजाला जोडायचे असेल तर तेली समाजाचे एकत्रीकरण करणे महत्त्वाचे आहे. राजकारणामध्येही समाजबांधवांना पाठिंबा दिला पाहिजे, असे मत महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कोषाध्यक्ष गजानन शेलार यांनी व्यक्त केले.
श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची रथ यात्रा व दर्शन सोहळा संत जगनाडे महाराज यांचे जन्मगाव सदुबरे येथून निघाली. या रथ यात्रेचे चंद्रपूर येथे आगमन झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तत्पूर्वी पडोलीपासून मोटारसायकल रॅलीने रथ यात्रेचा वरोरा नाका चौक जटपुरा गेट, पठाणपुरा अशी रथ यात्रा काढण्यात आली. पठाणपुरा मंडळ व समाजबांधवांतर्फे रथ यात्रेचे स्वागत करण्यात आले. जटपुरा गेट येथे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, भाजी खासदार हंसराज अहिर,खासदार बाळू धानोरकर, माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, खासदार रामदास तडस आदींनी चरण पादुकांचे पूजन करून रथ यात्रेत सहभागी झाले. यावेळी महासचिव भूषण कार्डिले यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी प्रांतिक तैलिक महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा समन्वयक सुधीर चौधरी, समन्वयक नरेंद्र चौधरी, अॅड. दत्ता हजारे, प्रकाश देवतळे,माजी आमदार देवराव भांडेकर, अजय वैरागडे, राजेश बेले, बबनराव फंड,यांनी मनोगत व्यक्त केले. मंचावर सूर्यकांत खनके,रतन हजारे, रवी जुमडे, मीनाक्षी गुजरकर, चंदा वैरागडे, श्रुती घटे, नगरसेविका छब्बू वैरागडे, माजी महापौर संगीता अमृतकर, गोवील मेहरकरे, शैलेश बेलखंडे, रवीलोणकर, जितेंद्र ईटनकर, चंदा ईटनकर आदींची यावेळी उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रकाश देवतळे, संचालन प्रा. विशाखा सारणे, आभार शैलेश जमडे यांनी केले. कार्यक्रमासाठी समाजबांधवांनी सहकार्य केले.