जुन्नर, पुणे :- तिळवण तेली समाजाचे आराध्य दैवत तुकाराम महाराजांचे ग्रंथ लेखक संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी सोहळा नारायणगाव शहरात श्री लक्ष्मीनारायण मंदिरात भव्य दिव्य स्वरूपात साजरा झाला, सकाळी सहा वाजता मंदिरात जगनाडे महाराजांना अभिषेक करून महाआरती करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता आळंदी येथील वारकऱ्यांच्या समवेत समाजबांधवांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी नारायणगाव मध्ये ठिक ठिकाणी त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. मिरवणुकीमध्ये नारायणगाव चे लोकनियुक्त सरपंच बाबुभाऊ पाटे तसेच असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. मंदिराजवळ मिरवणूक आल्यानंतर त्याचे प्रवचनात रूपांतर झाले त्यावेळी जगनाडे महाराज इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यात आला जगद्गुरु संत तकाराम महाराज यांचे मुळ लेखक श्री जगनाडे महाराज होते. या भव्यदिव्य कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातून भाविक भक्त एकत्रित आले होते .समाज बांधवांच्या आर्थिक उन्नती करिता समाजाने एक आर्थिक पतसंस्था निर्माण केली त्यामध्ये अनेक गोरगरीब जनतेला दिलासा देण्याचे काम करत आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल तात्या दिवटे यांनी केले समाज अध्यक्ष महेश वालझाडे चेअरमन सुदीप कसाबे उपस्थित होते तुषार दिवसे, प्रणव भुसारी बाळासाहेब दळवी, संजय कसबे, माऊली लोखंडे, प्रसाद दळवी, चैतन्य मावळे, हरीश दिवटे, दत्ता मावळे, सतीश लालची, दळवी आनंद, भगवान दळवी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप पुढाकार घेतला. समाजातील सर्व लहान-थोर तसेच महिला भगिनींनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाची भोजन व्यवस्था सद्गुरु केटर्स श्री गणेश दिवटे यांनी केली मंदिर सजावट आरोही लाईट आनंद दळवी यांनी केली.