दिनांक 2/1/2022 रोजी यवतमाळ जिल्हातील पांढरकवडा तालुका येथे तेली समाज सांस्कृतिक सभागृहाचा भूमिपूजन सोहळा तसेच संताजी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा केलापुर आर्णी मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर संदीपभाऊ धूर्वे यांचे हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास भाऊ काळे तर प्रमुख अतिथी म्हणून संताजी शिक्षण प्रसारक मंडळ माजी अध्यक्ष डॉक्टर दीपकराव शिरभाते, तेली समाज महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर भाऊ थोटे , संताजी संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यवतमाळ चे अध्यक्ष ज्ञानेश्वर रायमल, पांढरकवडा पंचायत समितीचे सभापती राजेश पसलवार, पिंपरी ग्रामपंचयतीचे उपसरपंच अक्षय कौरवार, बांधकाम सभापती न. प. पांढरकवडा शंकर कुणघाडकर, सेवक बंटी भाऊ जुवारे अध्यक्षा संताजी महिला विकास मंडळ पांढरकवडा श्रीमती शशिकला शिवाजीराव चव्हाण , अध्यक्ष मोरेश्वरराव डेहनकर संताजी विकास मंडळ पांढरकवडा , संताजी अध्यक्ष तेली समाज महासंघ पांढरकवडा राजेन्द्र दहापुते,सचिव धनंजय आंबटकर उपस्थित होते. मा. आमदार साहेबांनी ठोस मदतीचे आश्वासन दिले. याप्रसंगी श्रीमती शशिकला शिवाजीराव चव्हाण यांनी शिवाजी राव चव्हाण यांच्या स्मृती प्रित्यर्थ 51000रू तर प्रशांत नामदेवराव आंबटकर यांनी आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ 51000/रू. देणगी दिली. राजेंद्र दहापुते यांनी 21000/रू. तर संताजी शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ दीपकराव शिरभाते यांनी 21000/रू.देणगी दिली. कार्यक्रमाचे संचालन सचिन बोन्द्रे तर आभार प्रदर्शन सौ. संजिवनी नरताम यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील समाज बांधवांनी हजेरी लावली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दादाराव लटारे, दिनेश पिंपळे, प्रदीप सोमनकार, विवेक डेहनकर,आतिश कुक्कडकर , सुचिता चव्हाण व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.