संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा तर्फे सिंधुताई सपकाळ यांना आदरांजली

    संत जगनाडे महाराज चौक संताजी स्मारक  या ठिकाणी सिंधुताई सपकाळ यांना संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा तर्फे आदरांजली देण्यात आली या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने उपस्थित जवाहर वसतिगृहाचे अध्यक्ष  श्री रमेश गिरडे, संताजी ब्रिगेड तेली समाज महासभेचे संस्थापक श्री अजय भाऊ धोपटे प्रभाग 27 चे लोकप्रिय नगरसेवक हरीश डीकोंडावार  संताजी ब्रिगेडचे कोषाध्यक्ष  श्री रुपेश तेलमासरे महाराष्ट्र प्रदेश सहसंघटक श्री मंगेश साकरकर, श्री नंदु भाऊ धोपटे, संस्थेचे केंद्रीय सदस्य, श्री राकेश भावलकर, अध्यक्ष युवा आघाडी नागपूर शहर श्री प्रमोद उमाटे अध्यक्ष पूर्व नागपूर, श्री मंगेश कामडी अध्यक्ष मध्य नागपूर, श्री मगेश बोदरे, श्री मंगेश वंजारी, श्री विजय डाबरे,  राष्ट्रीय  मानव अधिकार आयोग ए:व जागृकता संघटन  अध्यक्ष नागपूर जिल्हा सौ मंजुषाताई चकोले, संताजी ब्रिगेडच्या महिला आघाडी नागपुर जिल्हा प्रभारी सौ चित्राताई माकडे मिनाताई भुते उपाध्यक्ष नागपूर जिल्हा महिला आघाडी, प्राध्यापिका सौ दीपा ताई हटवार वरिष्ठ सल्लागार श्री रवींद्र बावनकर, वरिष्ठ सल्लागार श्री रमेश रोकडे श्री शंशीकात डांगरे, श्री मंगेश नरड, श्री अजय सराटकर, श्री अतुल कावळे, श्री राजेश हटवार, श्री सुनील भाऊ मानापुरे, श्री चदुभाऊ वैद्य, श्री हटवार साहेब, श्री मंगेश दिवटे ,श्री केशवजी सुरकार साहेब, इतर गणमान्य नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वर्गीय ,सिंधुताई सपकाळ यांना आदरांजली दिली..

Santaji Brigade Teli Samaj Mahasabha Adranjali Sindhutai Sapkal    या कार्यक्रमामध्ये बोलताना सहसंघटक मंगेश साकरकर,  यांनी आपले विचार प्रगट करताना सांगितले की घर परिवार संपूर्ण गावकऱ्यांनी सिंधुताई ला गर्भावस्थेत गावाबाहेर काढले त्यांची परिस्थितीत त्या वर अवस्थेवर आल्या दुःखाचे डोंगर त्यांच्यावर कोसळल्यावर  आत्महत्या न करता व रडत न बसता त्याच अवस्थेत परिस्थितीचा सामना करत इतर लेकरांना आपले  पोटचे पोर समजून त्यांच्यावर आपली ममता चा नुसता हातच न ठेवता हजारो मुलांचा समूह तयार केला जगात  त्यांच्या कार्याची कुठेही तोड नाही. त्या  उत्कृष्ट कामगिरीमुळे जगप्रसिद्ध झाल्या. पद्मश्री हा पुरस्कार त्यांच्यासाठी छोटा वाटतो असे सांगत भारत सरकार नी त्यांना भारतरत्न देऊन नोबल पुरस्कार साठी प्रयत्न केले पाहिजे अशी मांग, केंद्र सरकारकडे संताजी ब्रिगेड तर्फे मंगेश साकरकर यांनी आपले विचार व्यक्त करताना केली,

     प्राध्यापिका साै दीपा हटवार यांनी सिंधुताई चा संपूर्ण जीवन शैली  बद्दल पूर्ण माहिती दिल्ली, सौ मंजुषा ताई चकोले सिंधुताई सपकाल ही कोणतेही पदाधिकारी व मंत्री नसतानासुद्धा आपल्या चांगल्या कर्मामुळे त्या जगाच्या आई झाल्या.. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे साऱ्या जगाला चांगल्या कामाची प्रेरणा मिळाली आपले विचार व्यक्त करताना मंजुषाताई चकोले यांनी सांगितले. संताजी ब्रिगेडच्या सौ चित्राताई माकडे यांनी सिंधुताई बद्दल बोलताना मरणासन्न अवस्थेतही, जीवन जगण्याच्या मुख्य रस्ता दाखविणारी एक मात्र महान आत्मा म्हणजे सिंधुताई सपकाळ असे आपले मत व्यक्त केले. संताजी ब्रिगेड तेली समाज महासभेचे संस्थापक श्री अजय भाऊ धोपटे सर्वांचा विचाराला आदर भाव देत कार्यक्रमास स्थगिती दिली.

दिनांक 10-01-2022 14:09:38
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in