धुळे - खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडीच्या वतीने लवकरच तेली समाजातील महिलांसाठी महत्त्वपूर्ण विषयावर महिला मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात आज महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.मालती सुनील चौधरी, सचिव सौ. सविता प्रताप चौधरी, कार्याध्यक्ष सौ. शुभांगी मुकेश चौधरी, कु. चारू सुनील चौधरी यांनी साक्री विधानसभा मतदार संघाच्या कर्तव्यदक्ष महिला आमदार सौ. मंजुळाताई गावित यांची भेट घेऊन महिलांच्या विषयावर सामाजिक चर्चा करून कार्यक्रमाविषयी सविस्तर चर्चा केली.
लवकरच खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून सौ. गावित यांनी कार्यक्रमास शुभेच्छा देऊन कार्यक्रमाला येण्याचे आश्वासित केलेले आहे. तेली समाजातील महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन, समाज प्रबोधन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे असे महिला आघाडीच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade