अमरावती : स्थानिक बडनेरा रोड स्थित जयभारत मंगल कार्यालयात मराठा ,देशकर , तिळवन, लिगांयत, तेली समाजाच्या "बंध नात्याचे" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कार्यक्रमाचे उदघाटक माजी पालकमंत्री जगदीशभाऊ गुप्ता व प्रमुख अतिथी म्हणुन माजी महापौर अशोकराव डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडला.
रविवार दि.०९ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वा कोवीड . कोरोनाचे चे सर्व शासकीय नियमांचे पालन करत, अगधी पन्नास समाज बांधवाच्या उपस्थित मध्ये कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन आयोजकांनी केले होते.
यावेळी जगदीशभाऊ गुप्ता यांनी आपल्या भाषणामध्ये बंध नात्यांचे या पुस्तकाचे कौतुक केले, आजच्या बदलत्या युगामध्ये, एकाच वेळी अनेक वधुवर परीचय मेळावे होत असल्याने त्यामुळे पैसा,अमुल्य वेळ वाचतो, तसेच वधुवर शोधतांना होणाऱ्या अडचणी दुर होतात ही एक संधी मराठा तेली समाज विकास मंडळ आपल्याला दरवर्षी उपलब्ध करुन देते , ही एक कौतुकास्पद बाब आहे त्यामुळे पालकांना योग्य वधु-वर शोधण्यास मदत होते.
तसेच माजी महापौर अशोकराव डोंगरे यांनी आपल्या भाषणात सुद्धा पुस्तकाचे कौतुक केले, आणी आजच्या युगामध्ये , समाजाची पुस्तके , मेळावे, सामुहिक विवाह सोहळा होणे आजच्या काळाची गरज आहे , अशे प्रतिपादन केले.
यावेळी व्यासपीठावर प्रामुख्याने समाज संघटनेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री चद्रकांत मेहरे , प्रा.डॉ.सजंयभाऊ तिरथकर, उपाध्यक्ष गजानन बाखडे, सचिव संजय रायकर , कोषाध्यक्ष यंशवत चतुर, रविन्द्र बाभुळकर , वसंतराव बाखडे ,संजय तायवाडे तसेच समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात सतांजी जगनाडे महाराजांच्या आरतीने, व बंध नात्याचे २०२२ या पुस्तिकेचे विमोचन मान्यंवराचे हस्ते करण्यात आले. तसेच पोलीस खात्यातील महत्त्वाचा राष्ट्रपती पुरस्काराने मा.श्री अशोकभाऊ मांगलेकर यांचा सत्कार मा.जगदीशभाऊ गुप्ता व उपस्थित मान्यवंराचे तर्फे करण्यात आला .कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मडंळाचे सचिव श्री.संजय रायकर ,सुञ संचालन प्रा.स्वप्निल खेडकर ,यांनी उत्तम रीत्या पार पाडले , तसेच आभार प्रदर्शन पंकज माहुरे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मा.श्री चद्रकांत मेहरे ,प्रा.डॉ.सजंयभाऊ तिरथकर ,गजानन बाखडे,संजय रायकर , नितीन बाखडे , यशवंत चतुर .अशोक मांगलेकर ,दिपक व्यवहारे, प्रा.स्वप्निल खेडकर ,प्रकाश तिडके, पकंज माहुरे,रमेश बोके,उल्हास ताकपिरे ,तुषार गिरमकर,राजु काळे,पकंज डाहाके ,चेतन सरोदे, अशोक देशकर, रविन्द्र बाभुळकर , वसंतराव बाखडे ,विठोबा मेहरे, संजय तायवाडे, बबन बाखडे, श्याम पाटील, राजेंद्र चांडोळे, श्रीकांत भनंग ,धिरज मानमोडे सह युवा आघाडी व कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले.