मुळगाव शिरवळ परंतु कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्य. मंबईत रेल्वेत नोकरी केली परंतु आपला व्यवसायीक पिंड शाबुत ठेवला. तो जवळ असल्यामुळे सायन कोळीवाडा येथे स्वीट मार्ट हा उद्योग सुरु केला. आज कोळीवाडा परिसरात गणेश स्विट मार्ट अतिशय दिमाखात उभे आहे. शुन्यातुन सुरवात केल्यामुळे सामाजीक जाणीव मुंबईत आल्यावर अनेक अडचनीला तोंड द्यावे लागते म्हणुन लालबाग मध्ये बकरी अड्यावर समाजाची संस्था उभी करण्याचे ठरविले या साठी कै. गंगाराम देशमाने, कै. राऊत हे हाडके यांच्या नेतृत्वा खाली संताजी सेवा मंडळ हाडके पुढे होते. याच जाणीवेतुन सातारा परिसरातील बांधवा साठी इमारत घेतली येथे पुर्वी निवासाची ही सोय होत होती. समाजाच्या गरजा सोडवणे संताजी उत्सव व सांस्कृतीक, सामाजीक कार्यक्रम ते साजरे करतात काही काळ अध्यक्ष ही होते. आज त्यांच पुतणे श्री. गणेश हाडके हे काम पहातात. श्री. दयाराम शेठ हाडके आज सेवानिवृत्त आहेत. परंतु आपले सेवा निवृत्तीचे वेतन ते घरासाठी नव्हे तर समाजासाठी खर्च करतात. अनेक सामाजीक उपक्रमासाठी ते आर्थिक मदत सातत्याने देत आसतात. त्यांचया त्यागातून अनेक सामाजीक उपक्रम आज सुरू आहेत. आपण ओबीसी आहोत हे ते विसरले नाहीत. ओबीसींच्या हाक्का साठी लढणार्या संघटनेला ही ते सढळ हाताने मदत करतात.