तेली समाजातील लोणंद शहरातील श्री. रमेश हरीभाऊ गवळी (अण्णा) यांचा माझा अनेक वर्षापासुन परिचय. पुर्वपार समाज सेवचा असलेला वारसा आदर्श पने चालु ठेवलला. कै. बाळासोा भारदे, कै. आ. बाळासोा. बारमुख, कै. रामभाऊ मेरूकर वाई आशा आनेक गांधीवादी विभुतीच्या विचाराची प्रेरणा. समस्त सातारा जिल्हा तेली समाज परिषद , सन 1988 ते 1992 पर्यंत 6 वेळा लोणंद येथे सामुदाईक विवाहाचे युवक संघटने द्वरा आयोजन यशस्वी करून प्रश्चिम महाराष्ट्रात प्रथम मुहूर्त मेढ रोवली त्याबद्दल सामुहिक विवाहाचे प्रणेते श्री. शांतीलालजी मुथा पुणे यांनी त्यांचा श्री. जगतगुर शंकराचार्य योच शुभ हस्ते व तत्कालीन गृहमंत्री भारतसरकार यांचे उपस्थीतीत स्मृती चिन्ह, शाल श्रीफळ देऊन भव्य सत्कार केला. श्री. संताजी महाराज पालखी सोहळ्याला प्रथम 37 वर्षापासुन सहकार्य, तेली समाज व इतर समाजातील वधु - वराची लग्ने भरपुर जमवीली खंडाळा तालुका तेली समाज अध्यक्ष, श्री. संताजी महाराज प्रतिष्ठाण संस्थापक अध्यक्ष, ओबीसी संघटना, प्रवासी व जेष्ठ नागरीक संघ, तसेच मा. अण्णा हजारे प्रणित भ्र.वि. जनआंदोलन न्यास सातारा जिल्हा सहसचिव, अशा अनेक पदावरून समाज कार्य सर्व धर्म समभाव, राजकारण विरहीत समाज कार्य प्रसिद्धी व सत्काराची अपेक्षा नाही, स्वत:चा धंदा संभाळून, आर्थिक झळ सोसणारा समाजसेवक भोर तेली समाजाने त्याचा कार्याची दखल घेत त्यांना समाजभुषण पुरस्कार प्रधान केला.
त्यामुळे या हरहुन्नरी निगर्वी स्वभावामुळे लहापनापासुन मोठ्या पर्यंत सामान्यापासुन उच्चशिक्षीत समाजात आदराने गवळी आण्णा प्रसिद्ध त्यांना या पुढे दिर्घायुष्य लाभुन समाज सेवा घडावी हिच श्री. संत संताजी महाराजाची चरणी प्रार्थना.
संकलन :- श्री. शरद भोसले (नाना) लोणंद