शंबुक - संताजी - डॉ. मेघनाद साहा प्रबोधन मंच संस्थेचे संस्थापक, पुरोगामी विचारवंत, लेखक, आमचे आधारस्तंभ दिवं. मा. मधुकरराव वाघमारे यांच्या स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन !
आदरणीय वाघमारे साहेब चार वर्षापूर्वी आमची साथ सोडून गेलेत ... त्यांनी उभे केलेले संघटन आणि वैचारिक प्रबोधन आजही हजारो कार्यकर्ते निष्ठेने पुढे नेत आहे...ओबीसी शिष्यवृत्ती, बेरोजगारी, तेली समाजाचा अपमान करणारे साहित्य त्या विरोधात वि ते स म ने केलेले आंदोलन यामुळे हजारो कार्यकर्ते तयार झालेत... देवळी, शेगाव, गडचिरोली, नागपूर, इ. महामेळाव्यांमुळे समाजात अस्मिता निर्माण होऊन समाजातील राजकीय नेत्यांना समाजाचे बळ मिळाले. राजकीय ताकद वाढली. विदर्भात अनेक पदाधिकारी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार निवडून येत आहेत, ओबीसी म्हणूनही त्यांच्यात अस्मिता जागी होत आहे. विदर्भ तेली समाज महासंघा ने पेरलेले बीज उगवत आहे, मात्र ते हाती आलेलं आयतं पिक ओबीसी विरोधी कसायाच्या हाती लागू नये म्हणून समाजाच्या जीवाला घोर लागला...
अनेक सामाजिक प्रश्न समाजातील अंधश्रद्धा, बुवाबाजी, धर्माधता, विद्यार्थी महिलांचे प्रश्न, जातीव्यवस्था, विषमता यामुळे समाजाची झालेली अधोगती समाज परिवर्तन, समाज क्रांती, अभियान या मासिकांतून मांडली. विधवा विधूर परिचय मेळावे सूरू करुन सामाजिक उत्तरदायित्वाची भावना निर्माण केली. तुमच्या पश्चात अजूनही अशा असंख्य सातत्यपूर्ण कार्यक्रमातून तेली समाजाचे प्रबोधन चालू आहे...वाघमारे साहेब...
संजय - अनुज