सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघटनेच्यावतीने रविवार, दि. १० एप्रिल रोजी करंजे नाका परिसरातील महासैनिक भवन येथे राज्यस्तरीय तेली समाज मोफत वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महासैनिक भवनात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात वधूवरांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यासाठी वधू-वरांची संपूर्ण माहिती असलेला फॉर्म भरून जमा करण्याची मुदत ३० मार्च करण्यात आली आहे. याआधी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामुळे अनेक वधू - वरांचे विवाह जुळले असून पैकी एक विवाह मेळाव्याच्या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात होणार आहे. या मेळाव्यात सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई या जिल्ह्यातून वधू - वर व पालक उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याचा सर्व समाज बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.