ओबीसींवरिल अन्यायाला संघटीत उत्तर द्या :- प्रदिप ढोबळे
पुणे :- ओबीसी सेवा संघ पुणे जिल्हा यांच्या वतीने ओबीसीवरील आन्याय या बाबत जागृती अभियान पुणे तिळवण तेली समाज कार्यालयात आयोजित केले होते. अध्यक्षस्थान मा. प्रदिप ढोबळे होते. ते पुढे म्हणाले मराठा समाजाची दांडगाईने ओबीसी करण होत असताना. ओबीसी सेवा संघाने महाराष्ट्र भर हे अभियान राबवुन प्रखर विरोध केला. राणे कमीटीला आपले म्हणने पटवून दिले. आज सांस्कृतिक दहशद वाढली आहे. या दहशदीला आपण संघटीत उत्तर दिले पाहिजे. आपण समाज पातळीवर आपल्या नात्या गोत्यात शत्रुत्व निर्माण करून समाजातच भांडतो. पण बाहेरील शत्रु समोर असंघटीत रहातो. हा विचार बदलला पाहिजे ही संघटना अराजकीय असल्या कारणाने समाजावर होणारे अन्याय दुर करण्यासाठी सातत्याने संघर्ष करित आसते. ओबीसी हा समुह न रहाता ही एक जात बनली पाहिजे या साठी रोटी व्यवहार बरोबर बेटी व्यवहार ही झाले पाहिजेत.
या वेळी सेवा संघाचे सचिव प्रा. दिंगबर लोहार म्हणाले, छटाकभर दुध गोळा करणार्या संस्थे पासुन सर्व सत्तास्थाने मराठा समाजाकडे आहेत. त्यांना वेगळे आरक्षणाला विरोध नव्हता तर आमचा पाठिंबा होता. पण आज या जात दांडगांची मराठा - कुणबी ही जात प्रमाणपत्रे घेऊन आमच्या घटनात्मक अधीकारावर जी गदा आणली आहे त्या साठी सेवा संघ लढा उभारत आहीे. सेवा संधाने कोल्हापूर जिल्हा स्तरावर गाव पातळीवर होणारे अन्याय गणिमी काव्याने दुर केलेत. आपण ही हा रस्ता निवडावा. या वेळी श्री. प्रताप गुरव यांनी उदघाटन केले त्यांनी आपल्या भाषणात मराठा - कुणबी या अस्तीत्वात नसलेल्या जाती विषयी प्रखर विचार मांडले. हाक्काची लढाई लढण्यासाठी समाज संघटीत असणे गरजेचे आहे हे विचार व्यक्त केले. प्रा. गौतम बेंगाळे व डॉ. प्रकाश सहिंद्रेकर यांना ओबीसी जाणीव पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले प्रा. गौतम बंगाळे यांनी पुणे विद्यापीठास सावित्रीबाई फुले विद्यापीठ हे नाव देण्याचा सर्व प्रवास मांडला. या कार्यक्रमाचे सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष मोहन देशमाने यांनी रस्त्यावरची लढाई सेवा संघाने आज पर्यंत कशी लढली हे मांडले या वेळी सर्वश्री संदिप थोरात, गणेश चव्हाण, प्रदिप कर्पे, केदारी, विशाल सुपेकर, काळे, सौ| सुपेकर यांना पदधीकारी म्हणुन नियुक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन जिल्हा अध्यक्ष श्री. रमेश भोज यांनी केल तर आभार कार्याध्यक्ष श्री. संदिप थोरात यांनी केले.
दिनांक 20-10-2014 21:51:47