स्वातंत्र सेनानी शंकरराव धावडे एक स्वातंत्र सेनानी गोवा मुक्ती अंदोलनाच्या काळात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या सह लढणारे समाज बांधव. मुंबई सह महाराष्ट्र झालाच पाहिजे या चळवळीतले म्होरके यासाठी अनेक वेळा तुरूंगात जावे लागले. कामगार व शेत मजुर यांच्या हाक्का साठी आयुष्यभर रस्त्यावर लढत राहिले. त्यातुन अनेक प्रश्न मार्गी लागले. त्यांचे लग्न झाले होते म्हणजे लग्नाच्या दुसरा दिवस होता. अंगावरची हळद तशीच होती. धार्मीक विधी बाकी होते. नवी नवरी वर्हाडा सह रात्रीच घरी आली होती तोच सकाळी बातमी समजली तहशीदार कचेरीवर मजुरांचा मोर्चा आहे. श्री. धावडे आपल्या पत्नीला घेऊन त्या मोर्चात सामील झाले त्या अंदोलनात त्यांना व त्यांच्या पत्निला ही अटक झाली. सामान्याचे प्रश्न सोडवता सोडवता स्वातंत्र्य सेनानी धावडे आज दमलेले आहेत.