अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा शिर्डी : गुढीपाडवा हिंदू नववर्षांच्या शुभ मुहूर्तावर श्री साईबाबांच्या व श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या शुभ आशीर्वादाने येत्या १३ मे २०२२ वार शुक्रवार दुपारी बारा वाजता श्री साई पालखी निवारा येथे होणाऱ्या श्री साईबाबा सेवा संस्थान, अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स यांचे संयुक्त विद्यमानाने आयोजित राज्यस्तरीय सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा २०२२ वर्ष पहिले याचे संपर्क कार्यालयाचे मोठ्या उत्साहात उदघाटन करण्यात आले.
यावेळी राहता तालुक्यातील जेष्ठ समाज बांधवांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन , दीप प्रज्वलन आणि रिबीन कापून उद्घाटन झाले राहता तालुक्यातील अनेक जेष्ठ, महिला युवक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली व तेली समाजाचे वतीने होणाऱ्या उपक्रमास तन मन धनाने सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
या सामुदायिक विवाह सोहळ्याचा तेली समाजाने जास्तीत जास्त जोडप्यांचे लग्न नोंदणी करून, मोठ्या परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. यावेळी अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभेच्या राहता तालुका महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ वैशाली ताई देशमाने यांचा निवडीबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला.
अॅड.विक्रांत वाघचौरे यांची जिल्हाध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आली, सौ माधुरी ताई लुटे यांना जिल्हा उपाध्यक्ष पदी बढती देण्यात आली तर श्री सुरेशराव नागले साहेब यांना जिल्हा उपाध्यक्ष पदी बढती देण्यात आली व सौ अनिता ताई लुटे यांच्याकडे राहता शहर महिला आघाडीची धुरा सोपवण्यात आली निवड झालेल्या सर्व पदाधिकारी यांचे अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभेने हार्दिक अभिनंदन केले.