सातारा लगत असलेल्या भोर शहरातुन वडील पुण्यात आले शुन्यात उभे राहिले. या वेळी कै. माधवराव धोत्रे बांधकाम क्षेत्रात शिरले आगदी या क्षेत्रात एक कामगार म्हणुन उभे राहिले. पुणे शहर व डेक्कन परिसरात ते उत्कष्ट बाधकाम करणारे परिचीत झाले. त्यांच्या कामाची जाणीव महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पर्यंत गेली. त्यांनी त्यांना कर्हाड येथे नेहले. कराड ही माधवरावांची कर्मभुमी ठरली विश्वास व दर्जा यामुुळे ते कराड परिसरात विश्वासास पात्र ठरलेल्याने अनेक शासकीय इमारीची कामे करता आली. कराड शहराचे वैभव म्हणुन शहर लायब्री आहे. या लायब्रीचे दर्जेदार काम ही माधवराव धोत्रे यांनी करून दिले आहे. आपल्या व्यवसायात त्यांनी जो ठसा उमटवला तसा तसेच ते सामाजीक जाणीवांचे होते. श्री. क्षेत्र सुदंबरे येथे संस्था कर्यात सहभागी असत. पुणे तिळवण तेली समाज संस्थेचे ते विश्वस्त म्हणुन काही काळ होते. सातारा जिल्हा समाज संघटनेची पाळे मुळे 30/35 वर्षी पुर्वी कै. रामभाऊ मेरूकर, कै. सिताराम शेठ शेडगे यांच्या बरोबर रोवण्यात सोबतीला होते.