सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या तेली समाजाने एकत्र यावे. एकजुट झाल्याशिवाय त्मचीआमची ताकद वाहणार नाही. एकट होईल तेव्हाच आपली प्रगती होईल असे प्रतिपादन संताजी महाराज देवस्थान, सुदंबरे, जि. पुणेचे अध्यक्ष शिवदास उबाळे यांनी केले.
सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघाच्यावतीने राज्यस्तरीय वधू - वर व पालक मेळाव्यात ते बोलत होते.
कार्यक्रमास अमरावतीचे विभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर हाडके, गुहाघरचे तहसीलदार समर्थ क्षीरसागर, खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
उबाळे म्हणाले, तेली समाजाचे आराध्यदैवत श्री संत संताजी महाराजांच्या समाधी मंदिराच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने दहा कोटी रुपयांचा निधी दिला असून या निधीच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागणार आहेत.
या कार्यक्रमात चंद्रशेखर हाडके, अनिल विभते, समर्थ क्षीरसागर यांची भाषणे झाली. अध्यक्ष सुभाष हाडके यांनी आपले मनोगत व्यक्त करत संघटनेचा वार्षिक आढावा घेतला. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. मंगेश क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. मोहन विभूते यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष मनोज विभूते यांनी आभार मानले.
कार्यक्रमास माजी अध्यक्ष अनिल भोज, अनिल क्षीरसागर, गजानन दळवी, तैलीक महासंघाचे माजी उपाध्यक्ष जयसिंगराव दळवी, ज्येष्ठ संघटक सुरेश चिंचकर, दिलीप भोज, संस्थापक सचिव बाळकृष्ण वीरकर, वसंत खर्शीकर, अशोक भोज, सुरेश किर्वे, आनंदराव दळवी, हणमंत क्षीरसागर, प्रमोद दळवी, दिलीप दळवी, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.