महाराष्ट्रा पासुन दुर कर्नाटक राज्यात हुबळी येथिल भुस पेठ मध्ये शंभर दिडशे वर्ष रूबाबात मिरवणारे नाव. हिंदुस्थान लिव्हर सारख्या दर्जेदार उत्पादनाचे मुखय विक्रते, टोलेजंग फलोअर मिलचा चार ठिकाणी पसारा. सन 1900 च्या दरम्यान सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्या मधील कै. अंबाजी क्षिरसागर यांनी कुटूंबच बैलगाडीत बसवले. करडीच्या शोधात होते. करडी असेल तर तेलघाना चालेल तो चालला तर घर चालेल. सांगली मिरज करीत ते अथनी येथे गेले. या अथनीत काही काळ घाना सुर ठेवला. इथे ही निट जम बसेना. ओळखी पाळखी काढत हुबळी येथे पोहचले. इथे करडी व शेंग मुबलक होती. घान्याला गाळप मिळत होते. तेल पेंड खपत होती. धंद्यात जम बसत होता. कै. काशिनाथ हे व्यवसायात अतिशय तरबेज. सगळी व्यापारी गणीते अत्मसात करून त्यांनी नव नव्या व्यवसायत जम बसवला याच गणीताने पक्के असलेल कै. मल्हारराव कचुरे यांना सोबत घेतले. आपल्या संस्काराने व विचाराने घडविले. नुसता कर्नाटकच नाही महाराष्ट्र, गोवा, गुजराथ येथे खरेदी विक्री व्यवस्था निर्माण केली. कै. बाळकृष्ण, कै. रघुनाथराव हे कै. काशिनाथरावाची दोन मुले. त्या काळात महाबळेश्वर येथे निवासी शाळेत उच्च शिक्षित झाले. या शिक्षणाचा व्यवसायात उपयोग करू लागले अन्नपुर्णी फलोअर मिल सुरू केली. परंतु कै. बाळकृष्ण यांचे अल्प वयात निधन झाले. सर्व जबाबदारी कै. रघुनाथराव यांच्याकडे आली. त्यांनी बेळगाव येथे विजय महंतेश फ्लोअर मिल व कोल्हापुर जवळ केदारेश्वर मिल सुरू केली. कै. अंबाजी नांदगिरीकर हे शुन्य घेऊन गेले. परंतु शेकडो जमिनीचा पसारा व जोडीला व्यवसायाचा पसारा.
नांदगीरीचे हे क्षिरसागर नांदगीरी पासुन दुर गेले परंतु आपल्या गावाला आज ही नांदगीरीकर या आडनावाने सर्वांना ओळख देतात. नांदगीरी येथे त्यांनी मंदिर उभारून दिले आहे. आपल्या घराण्याची देवी आरफळ येथे आहे त्याची ही ाठवण ठेवली आहे. सुदूंबरे श्री संत संताजी यांच्या समाधी जवळ ज्या आज शाळे साठी खोल्या आहेत. त्या खोल्यांचे बांधकाम ही त्यांनी करून दिले आहे. पडता काळ आहे म्हणुन जेजे बांधव जवळ आले त्या त्या बांधवांना त्यांनी उभे रहाण्यास मदत ही केली. पैशाचा माज व मस्ती न दाखवता समाजच्या शेवटच्या घरात पोत्यावर बसुन गुळाचा चहा ही मी पिताना नांदगीरीकांना पाहिले आहे.
मी माझ्या अपुर्ण शिक्षणासाठी बेळगाव येथे वास्तव्यास असताना जीवनाच्या संघर्षाची लढाई लढत होतो. या वेळी कै. रघुनाथराव नांदगीरीकर भेटले. शिक्षणासाठी पाठी मागे राहिलेच उलट समाजा पासुन शेकडो मैल दुर असलेला मी त्याच्या कडुन समाज समजुन घेतला माझे समाजीक मन इथेच तयार झाले कारण तेही सातारकर होत. मी ही सातारकर.