धुळे - येथील खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने मातृदिनाच्या निमित्ताने रविवार, ८ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या अभूतपूर्व अशा मातृ - वंदन सोहळ्यासाठी वेगवेगळ्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राहून जलतीर्थ संकलित करण्यात येत आहे. खान्देश तेली समाज मंडळाचे मार्गदर्शक श्री यतिनआप्पा रतन चौधरी यांचे चिरंजीव श्री पियुष यतिन चौधरी व सौ. पल्लवी पियुष चौधरी यांनी हिंदू धर्मातील पवित्र समजल्या जाणाऱ्या गंगा नदीचे जल तीर्थ हरिद्वार येथे जाऊन दर्शन घेऊन गंगा नदीचे पवित्र जलतीर्थ संकलित केले. याप्रमाणे पवित्र ठिकाणच्या जलतीर्थाचे पूजन करून त्याने मातेचे पाद्य पूजन करून मातेला वंदन करण्याच्या या अविस्मरणीय सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी साक्षीदार व्हावे व मातृ-वंदन सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade