लातूर वीरशैव तेली समाजाच्या वतीने मा. ना. श्री अमित देशमुख साहेब ( पालक मंत्री तथा वैदकीय शिक्षण मंत्री,महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र चिकित्सा शिबीर आयोजित केले होते. आपण आपल्या समाजातील जेष्ठ नागरिकांना आव्हान केले होते. त्यानिमित्ताने आपल्यातील 18 जेष्ठ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. त्यापैकी आज जगप्रसिद्ध डॉ. श्री तात्याराव लहाने साहेब यांच्या हस्ते मोतिबिंदु शस्त्रक्रिया खालील जेष्ठ बांधवांची करण्यात आली. 1) श्री चंद्रकांत बाबूअप्पा मेंगले 2) श्री संभाजी रामलिंग गंगणे 3) श्री मन्मथ काशिनाथ फेसगाळे 4) श्रीमती भागीरथी विश्वनाथ देशमाने
वीरशैव तेली समाजातर्फे समाजाचे श्री किशोर मन्मथ भुजबळ ( अध्यक्ष वीरशैव तेली समाज, लातूर ) श्री अजय कलशेट्टी ( सचिव वीरशैव तेली समाज,लातूर ) श्री इंद्रजित राऊत ( सह सचिव वीरशैव तेली समाज,लातूर ) श्री सुदर्शन क्षीरसागर ( कोषाध्यक्ष वीरशैव तेली समाज,लातूर ) श्री राजेश्वर हरनाळे सर ( संचालक वीरशैव तेली समाज,लातूर ) श्री हनुमंत ( मुन्ना ) भुजबळ ( संचालक वीरशैव तेली समाज,लातूर ) आणी नेत्र चिकित्सा शिबिराचे प्रमुख श्री सोनू डगवाले ह्या सर्वांनी मिळून आपल्या समाजातील शस्त्रक्रिया झालेल्या जेष्ठ नागरिकांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी बाहेर अंदाजे 25 हजार ते 45 हजार खर्च येतो. आज आपल्या जेष्ठ नागरिकांचे ऑपरेशन हे फ्री मध्ये झाले आहे. ह्या शिबिरासाठी आपले अध्यक्ष श्री किशोर भुजबळ आणी संचालक श्री मुन्ना भुजबळ व संचालक श्री संजय उदगीरे यांनी बहुमोल सहकार्य केले. या प्रसंगी श्री मन्मथप्पा लोखंडे ( संस्थापक अध्यक्ष वीरशैव तेली समाज, लातूर ) यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.