धुळे - खान्देश तेली समाज मंडळाची वार्षिक बैठक रविवार,दिनांक ८ मे रोजी दुपारी तीन वाजता संपन्न झाली. या बैठकीत खान्देश तेली समाज मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नियोजित नोव्हेंबर महिन्यात होणारा आहे वधु-वर परिचय मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार केलेला आहे. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी मेळावा घेण्याचे निश्चित केले असून याआधी तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. त्या तारखेला सर्वांनी एकत्र घेऊन मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी केला.
बैठकीच्या सुरुवातीस संपूर्ण वर्षभराचा जमा खर्चाचा अहवाल सादर करण्यात आला या हिशोबास सर्वांनी हात उंचावून मंजुरी दिली. त्यानंतर विविध विषयांवर चर्चा होऊन नियोजित वधू- वर परिचय मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार सर्वांनी केला. वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीमध्ये धुळे व जळगाव जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी होते. मंडळाचे सचिव रविंद्र जयराम चौधरी यांनी सर्व जमाखर्च सादर करून वर्षभरातील कामगिरीचा आढावा दिला. महिला आघाडी च्या कार्यकारिणीची लक्षणीय उपस्थिती यावेळी होती. याच वेळी नवीन नियुक्ती झालेल्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र अध्यक्ष सौ. मालती चौधरी व सचिव सौ. सविता चौधरी यांच्या हस्ते देण्यात आले. खेळीमेळीच्या वातावरणात बैठक संपन्न झाली.