सुदुंबरे संस्था व तिची शिक्षण समीती म्हणजे भाऊ मेरूकर होत. वाई या त्या वेळच्या गावात कै. विश्वनाथ चिंचकर यांनी तेली समाज परिषदा 1920 च्या दरम्यान भरवल्या होत्या. कै. भाऊंनी समाज लहान पणी पाहिलेला आपला व्यवसाय पहात ते समाजकाम संभाळत होते. स्वातंत्र्याच्या लढाईत ते अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या अडचणी सोडवत घरातील जबाबदारी सांभाळुन काँग्रेस सेवा दलाची जबाबदारी पार पाडत. त्यामुळे स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेता आला होता. स्वातंत्र उत्तर काळात वाई तालुका काँग्रेस सेवा दल तालुका अध्यक्ष ही होते. संघटन व सेवा ही कै. भाऊंची समाज कार्याची बैठक. सुदुंबरे येथे जात समाज बैठकीत सहभाग घेत. संस्थेने सामाजीक जाणीव ठेऊन होतकरू विद्यार्थींना मदत देण्याचे ठरविले कै. भाऊंनी समाजातील काही गरीब विद्यार्थीना दत्तक घेऊन मदत केली. संस्थेची शिक्षण समीती सशक्त असेल तर मदत ही चांगली देता येते. हे विचार मांडून भाऊ थांबले नाहीत तर त्यांनी समिती प्रमुखा बरोबर महाराष्ट्रभर दौरे ही काढले. त्युळे बरीच वर्ष भविष्यात शिक्षण समीती गरिब विद्यार्थाना शैक्षणिक मदत देत होती. समाज म्हणजे भाऊ व भाऊ म्हणजे समाज असे समिकरण होते. वाई येथे समाजाची तेल उत्पादक सोसायटी ही सुरू केली होती. त्यामुळे तेल उत्पादन करणार्या बांधवांना मदतीचा हात देता आला समाजातील अनेक बांधवांना त्यांनी मार्गदर्शनाचा व सहकार्याचा हात दिला आहे त्यामुळे बरेच जन आपल्या आयुष्यात खंबीर उभे आहेत. तेली गल्ली (गावकूस) 1983 मध्ये सुरू करताना कै. भाऊंनी समाज समजुन दिला वाटचालीचे मार्गदर्शन ही केले. आज तेली गल्ली मासिकाने जी गरूड झेप घेतली त्यास कै. भाऊंचे मार्गदर्शन महत्वाचे आहे.
भाऊ एक समाज सेवक. त्याची अशी शेकडो उदाहरणे आहेत जागे अभावी मोजकीच मांडत आहे. वाई महाबळेश्वर रोडवर मिशन हॉस्पीटल म्हणजे समाज सेवा केंद्र. भाऊंनी त्या समोर एक किराणा दुकान सुरू केले होते. या किराणा दुकानात हॉस्पीटल मध्ये येणार्या पेशंट व नातेवाईका साठी त्यांनी ना नफा ना तोटा या भुमीकेने किराणा माल दिला. हि सेवा अनेक दशके बांधवांना भाऊ हे आधारवड ठरले आहेत. त्या ही पेक्षा आजच्या झगमटाच्या वावरण्यात एक सत्य झाकुन गेले आहे. भाऊंनी उमेदीचा काळ समाजासाठी खर्च केला परंतु 1980 च्या दरम्यान अॅड. बारवडे वकील, केशवराव विरकर, सिताराम बापु शेडगे, माधवराव धोत्रे, देशमाने या मंडळींना घेऊन समाज संघटन सुरू केले यातुनच ही पहिली समाज संस्था रजिस्टर होण्या पुर्वीच भऊंचे निधन झाले तरी सुद्धा भाऊ अनेकांचे दिपस्तंभ आज ही आहेत.