इतिहासाच्या पानावर काही तुरळक गोष्टी सापडल्या नसत्या तर काही वेळा बरे वाटते. बरे या साठी बरे झाले आमचे पुर्वज नाकर्ते होते. अडचण अशी तुरळक गोष्टी जेंव्हा सापडतात तेंव्हा आमच्या सामाजीक, राजकीय, धार्मीक, सांस्कृतीक गोष्टींचा शोध घेतला तरी हाती काहीच सापडत नाही. एक निराशावादी नाही पण निराशेकडे नेहणारी पाऊल वाट सुरूवातीस अरुंद दिसते पण ती चालल्यावर मात्र महामार्गात रूपांतरीत कधी झाली हेचसमजत नाही. आपण जे किंचीत सापडले त्याचा मागोवा कधी घेत नाही. उलट वर्तमानात त्याची सांगड त्यात मिसळतो ते मिसळण्याने पुन्हा पराक्रमाचा इतहास एक संकुचित करतो. हे संकुचित पण म्हणजे आपला दैदिप्यमान इतिहास ही आपली परंपरा म्हणुन समजतो. उरापोटी घेऊन वाढवतो व गर्वाने सांगतो हीच आपली बाप जाद्यांची कमाई. आता तुम्ही ही परंपरा पुढे चालवा. परंपरा म्हणजे इतिहास नव्हे. परंपरा सातत्याने बदलत असतात काही वर्षात त्यात बदल होतात हे बदल कळत नकळत घडत असतात. काही दशकात मुळ इतिहास ही पुसला जातो. असा इतिहास पुसणे, असा इतिहास विसरणे, पराभवाच्या इतिहासाला गर्वाचे स्वरूप देणे. आपल्या शौर्याला नाकारणे. म्हणजे आपले अस्तीत्व आपण संपवुन टाकणे होय. कारण महाराष्ट्रातील, जाणते बांधव, सर्व पातळीवरचे समाज कार्यकर्ते यांना पाहिले तर ते आपल्या कार्याची सुरूवात संताजींच्या फोटो पुजन्याने करतील. होता संतु म्हणुन वाचला तुका, तुकोबांच्या चौदा टाळकर्या पैकी एक टाळकरी संत संताजी संत तुकोबा गाथा पालन कर्ते म्हणजे संत संताजी. मी सुद्धा वरिल समजत होतो. पण संत संताजी सर्व दिशांनी जेंव्हा समजुन घेऊ लागलो तेंव्हा मला संत संताजी वरिल पद्धतीने मांडणे हेच मुळात त्यांच्यावर फार मोठा अन्याय करण्या सारखे आहे. हे माझेच मला समजुन आले. संत संताजी पुर्ण समजले नाहीत पण जे समजले संभाळले व वाटले सुद्धा. त्या शब्दांच्या शस्त्राने पुढे शेकडो वर्ष माणसाला जगता येऊ लागले. पण ही संत संताजींनी संभाळलेली शस्त्रे आज आपणच त्यांना दुर लोटत आहोत. तेंव्हा पुन्हा एक वेळ संत संताजी समजुन घेऊ.