नगर - संत जगनाडे महाराजांनी दाखविलेल्या मार्गावर आपण चालले पाहिजे. संतांचे विचार आत्मसात करुन जीवनात त्याचे आचरण करावे. समाजाचे आपण काही देणे लागतो, या भावनेने काम केले पाहिजे. तेव्हाच समाजाचा उध्दार होत असतो, असे प्रतिपादन तिळवण तेली समाज ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश सैंदर यांनी केले.
तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने तेलीखुंट येथे बांधण्यात आलेल्या 'संताजी संकुल' चे उद्घाटन बबनराव सैंदर, श्रीमती लक्ष्मीबाई बाबुराव डोळसे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रभाकर देवकर, प्रसाद शिंदे, सागर काळे, दत्तात्रय डोळसे, सचिन शेंदुरकर, मनोज क्षीरसागर, गोकूळ कोटकर, सुनंदा नागले, निता लोखंडे, गणेश लोखंडे, अशोक डोळसे, श्रीराम म कुडे, गणेश धारक, अर्जुन डोळसे आदी उपस्थित होते.
दाळमंडईतील विठ्ठल-रुख्मिणी मंदिर श्री संताजी भवन येथे श्री तुकाराम महाराज गाथ्याचे लेखक श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त हभप रामदास महाराज क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहांतर्गत गाथा पारायण, भजन, हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. हभप रामदास महाराज क्षीरसागर यांचे काल्याचे किर्तन झाले. नगरमधील चित्रकार अशोक डोळसे यांनी रेखाटलेली संताजी महाराज यांची प्रतिमा व पादुकांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे नेता सुभाष चौक येथे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी स्वागत केले. तसेच अर्बन बँक चौक येथे महापौर बाबासाहेब वाकळे व उपमहापौर मालनताई ढोणे, सुवेंद्र गांधी, सचिन जाधव यांनी स्वागत केले. या मिरवणुकीत हभप गणेश महाराज शेंडे यांच्या नेतृत्वाखाली पारनेर येथील पिंपळनेरच्या वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या मिरवणुकीत शौर्य ढोल पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
यावेळी शिवलिंग चौथे यांनी देवीची पूजा केली तर श्रीराम म कुडे यांनी श्रीखंडा अभिषेक केला. या कार्यक्रमात सुरेश शिंदे, हरिभाऊ डोळसे, अनिल सैंदर, ओम नागले, गणेश म्हस्के, चंद्रकांत भागवत, साईनाथ वाल्हेकर, निशिकांत शिंदे, सागर सातपुते, लक्ष्मण डोळसे, बाळासाहेब हुच्चे, राजेंद्र धारक, मुरली दारुणकर, पवन साळुके, अॅड. विनायक दारुणकर, मंगेश ढवळे, गणेश कोटकर, दिनेश सौर सहभागी झाले होते. महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.