समाजाचे एक जेष्ठ विचारवंत व विदर्भ तेली समाज संघर्ष समितीचे प्रमुख श्री. मधुकर वाघमारे मला नागपुर भेटीत म्हणाले होते. संत संताजीचे संदर्भ फार कमी ठेवलेत फार मोठी अडचन मांडणी करताना होते. आणी मी ते अव्हान स्विकारले तेंव्हा त्या बाबत वाचन व चिंतन करू लागलो. तेंव्हा संत संताजी विषयी शोध घेतला बरेच रस्ते सापडले. त्या रस्त्यावर एक महान पुरूष समोर आला. तेल्याने मावळत बाजुला रहावे. त्याच्या घाण्याचा आवाज ही येऊ नये. तेल्याने मंदरातील देवाला तेल द्यावे त्या तेलाने स्वत: जळुन देवाचा अंधार नष्ट करावा. पण हाच तेली समोरून आला तर अशुभ मनावे ही धर्मशास्त्राची आज्ञा ती खाली मान घालून मानावी हा आदेश नव्हे तर पुढच्या जन्म चांगला मिळावा या साठी ही रस्ते तयार केलेले दहशत एवढी की या बद्दल जो तक्रारार करेल त्याला शिक्षा ही ठरवलेली धर्म शास्त्र नुसार ती देत आसत. त्यामुळे भीतीदायक वातावरण ताठ मान न ठेवता मान खाली घालुन आज्ञा पालन करणे म्हणजे ईश्वराचे आदेश पाळने. परंतु सर्व माणसे परमेश्वराची लेकरे आहेत. हे जग विष्णुमय आहे प्रत्येका जवळ तो अंश आहे. हे जर सत्य आहे गर्व, अभिमान कश्यासाठी चार वेद, चार आश्रम हा जेथे पाया आहे. यातला ब्राह्मणश्रेष्ठ आहे. याही पुढे जाता आसे दिसेल चार लक्ष योनीत मानव हाच श्रेष्ठ आहे. या मानवात ब्राह्मण सर्व बाबतीत श्रेष्ठ आहे. हे जर तुम्ही सांगत असाल याही पुढे जाऊन तुकोबा मांडणी करतात तु पंडीत झालास पुराणे सांगतोस ढिगभर पोथ्या हाताळतोस परंतु गुरुच्या मदतीने कळणारी खुण ब्राह्मणाला समजत नाही. कुणब्याचा तुक्या शाास्त्र मत सांगतो हे जाणत नाही. परंतु पंढरीनाथावर विसंबुन रहाण्यास समाधान मानतो पंढरपुर हे समतेचे ठिकाण आहे. या समतेवर माझी निष्ठा ओहे. आणी संत संताजींनी पंढरपुरच्या समतेवर निष्ठा ठेवली. ती निष्ठा ही एक धार लावलेले शस्त्र होते. ती निष्ठा ही एक डोळस होती कारण निष्ठा या बाबतची पुर्ण जाणीव संताजी जवळ होती . ही निष्ठा त्या वेळच्या धार्मिक विषमतेतुन निर्माण झालली होती. त्याचे बीजारोपण तुकारामांच्या संगतीत येण्या पुर्वी झालेली असावे कारण तुकोबांनी बिजारोपणास जोपासले व तरतरीत ठेवले. अनेक हाल्ले, अनेक आरोप, अनेक अडथळे दुर सारण्याची एक चेतना जरूर दिली असणार हे नाकारता कदापी येणार नाही त्यामुळे संत संताजी संत तुकारामांचे अनुभव कथन जन माणसात रुजवताना सांगत चार वर्ण त्यातील पहिला वर्ण अभिमानाने जगतोय बाकीच्यांना मान खाली घालुन जगावयास लावतोय. आसल्या वर्ण अभिमानाने देश पवित्र होत नाही. देव पवित्र हवा असेल तर संताचे वास्तव्य त्या ठिकाणी हवे संतांची समता त्या ठिकाणी हवी. विठ्ठल म्हणजे समता हा विठ्ठला जवळचा. ज्याला तुम्ही पवित्र काशी म्हणता गया, राधाम म्हणता ती सर्व ठिकाणे विठोबाच्या पायाजवळ आहेत. प्रयाग व काशीची तुलना विठ्ठलाच्या नामाशी होत नाही. ही परखड मते घेऊन त्यांनी मान खाली घातली नाही तर समोरच्या व्यवस्थेला ठणकावल कशाला करता तपाचे डोंगर तुमच्या त्या सर्व धडपडी पेक्षा, तुमच्या अभिमाना पेक्षा माझा विठ्ठल श्रेष्ठ तर तो बुलंद आपले कर्तव्य समजेल.