चाकणच्या एैतिहासिक रुमाल मध्ये संतु जगनाडा असा उल्लेख आहे. संत संताजींचे पहिले भाष्याकार कै. कृष्णाजी नारायण वैरागी यांनी काही पुरावे देऊन हे सर्व स्पष्ट मांडले आहे. आज ही चाकण येथे पिड्यान पिड्या जगनाडे परिवार आहे. देहू व सुदूंबरे हे अंतर 4/5 कि.मी. आज ही आहे. संत तुकारामांनी मला नक्की काय करायचे याचे चिंतन सुदूंबरे परिसरात केले आहे. सुदंबरे हे संताजीच्या मामाचे मुळ गाव. या गावात आज ही मामांचे वशंज काळे कुटंबीय आहेत. त्यामुळे संत संताजींचा वावर जास्त करन याच ठिकाणी असावा या विचार धारेला अधीक पुष्टी मिळु शकते. परंतु काही चित्रपट व इतर ठिकाणी त्यांचे वास्तव्य देहू दाखवतात. या दाखवण्यातुन त्यांचे वास्तव्य नक्की कोठे होते हा संभ्रम जरी निर्माण होतो तरी यातुन एक साध्य होते ते नजरेच्या टापुत ठेवणे गरजचे आहे. ते साबीत असे की लहानानापासुन तुकोबा व संताजी हे सवंगडी होते जाणीव विकसीत झाल्या नंतर जो क्रांतीचा यज्ञ केला तो करण्यात संत संताजी हे एक प्रमुख होते. एवढेच नव्हेे तर संत संताजी ही व्यक्ती जरूर शुद्र जातीत जन्मलेल असतील. फक्त लिहीता वाचता येण्या पुरते शिक्षित असतील जरूर त्यांना ही सर्व अधीकार नाकारले आसतील जरूर ही मुखवटे रचणारी मंडळी, त्यांचे पोटभरू शास्त्र त्यांची बनवेगीरी नष्ट करणारा एक महान योद्धा हा फाटक्या समाजात, फाटक्या घरात जन्म घेऊन सुद्धा ही व्यवस्था उध्वस्त करण्यात संत तुकाराम बरोबर होता. हे नजरे आड करून चालणार नाही. हे सर्व पहिल्या नंर एक बाबीवर विसंबुन रहाता येईल कोणत्याही स्त्रीला आपले माहेर प्रिय आसते. आई बरोबर लहान मुले ही आजोळी रमतात आणी तीच शक्यता इथे जास्त आहे. लहानपणी बराच काळ संत संताजी आपल्या आजोळी वास्तव्यास असावेत. आणि समविचारी म्हणुन दोघे एकत्र आले आणी ही क्रांतीची ठिणगी घेऊन ते वाटचालु लागले.
(अपर्ण लेख पुढील अंकात)