धुळे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेशाध्यक्ष व खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली व कार्याध्यक्ष अशोककाका व्यवहारे, महासचिव डॉ. भूषण कर्डिले व कोषाध्यक्ष गजानननाना शेलार, ठाणे विभाग अध्यक्ष सुनील चौधरी, युवा आघाडी प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी, जेष्ठ नेते बबनराव चौधरी यांच्या मार्गदर्शना खाली रविवार दि.१० जुलै रोजी सकाळी १० वाजता पारोळा रोडवरील रचना हॉल येथे खान्देश विभागातील धुळे व नंदुरबार समस्त राज्यस्तरीय, विभागीय, जिल्हा, तालुका, सेवा आघाडी, महिला आघाडी,व युवा आघाडी स्तरीय सर्व पदाधिकारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सकाळी १० वा. आषाढी एकादशीनिमित्त संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांच्या पुतळ्याला खा. रामदास तडस व मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात येईल. यानंतर बैठकीला सुरुवात होईल. यावेळी संघटनेची कायमस्वरुपी ओळख निर्माण करेल तसेच संताजी महाराज यांचे छायाचित्र असलेल्या गौरवचिन्हाचे उद्घाटन होईल. त्यानंतर पदाधिकारी परिचय व नवीन पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात येईल. या आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष व खा. रामदास तडस, अशोककाका व्यवहारे, डॉ.भूषण कर्डिले व गजानन शेलार हे चर्चा व मार्गदर्शन करणार आहेत.
सर्व पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी महासचिव नरेंद्र चौधरी, जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, विभागीय कार्याध्यक्ष शशिकांत चौधरी, विभा. उपाध्यक्ष अनिल अहिरराव,डॉ. भूषण चौधरी, डी.डी. महाले, दिलीप सुर्यवंशी, सुभाष जाधव, तुषार चौधरी संजय चौधरी, दिनेश बागुल, गणेश चौधरी, पोपटराव चौधरी, रमेश करनकाळ, हिरुआप्पा चौधरी, किशोर थोरात, कल्पेश चौधरी, भगवान चौधरी, योगेश चौधरी, मनोज चौधरी, किरण बागल, मनोहर चौधरी, किरण चौधरी, विनोद चौधरी, राजुगणपत चौधरी, विजय चौधरी राहूल अहिरराव, महेश चौधरी, किशन थोरात, गणेश चौधरी, विलास चौधरी, गोविंद चौधरी, महेश बाविस्कर, सजन चौधरी, रणवीर चौधरी, अनिल थोरात, उदय चौधरी, नंदुरबारचे देवाबापू चौधरी, भानूदास चौधरी, संजय चौधरी गोरख चौधरी, दगडूशेठ चौधरी, सागर चौधरी, संदीप चौधरी, रोहित चौधरी, विनोद चौधरी, कल्पेश थोरात, सुनील चौधरी, संजय चौधरी, हर्षल चौधरी, राजेंद्र चौधरी, डॉ. गणेश चौधरी,उमेश चौधरी, लोकेश चौधरी, रामभाऊ चौधरी, जितेंद्र चौधरी, प्रशांत बागुल, ललित महाले, वाल्केश चौधरी यांनी केले आहे.
नियोजनाबाबत अथवा सभेतील कामकाजाबाबत काही शंका, सूचना असल्यास युवा आघाडीचे राज्य महासचिव नरेंद्र चौधरी (मो.नं. ७०३८७३६९५०) व तुषार चौधरी (मो.नं.९४०३१९१०१०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.