पुणे, - प्रदेश तेली महासंघाची नुकतीच जिल्हा, तालुका व पुणे शहर पातळीवरील कार्यकर्ता बैठक कर्वेनगर येथील श्री संताजी सभागृह येथे नुकतीच आयोजित करण्यात आली. अध्यक्षस्थानी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संतोष माकडे, तर प्रमुख पाहुणे प्रिया महिंद्रे, महासचिव ज्ञानेश्वर दुर्गुडे, उपाध्यक्ष विजयभाऊ रत्नपारखी, युवा उपाध्यक्ष सागर व्हावळ, महिला आघाडी उपाध्यक्ष नीलम घाटकर, निशा करपे, उज्वला पिंगळे उपस्थित होत्या.
महासंघाचे पुणे शहराध्यक्ष सुरेंद्र दळवी यांनी स्वागत केले. महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश भोज महासंघाच्या ध्येय धोरणांवर तसेच भविष्यातील योजनांबद्दल माहिती दिली. या बैठकीत जिल्हा, तालुका व शहर पातळीवरील सुमारे १०० पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप शिंदे, तर पश्चिम महाराष्ट्र सचिव गणेश पिंगळे यांनी नियोजन केले.
यावेळी सचिव सुवर्णा भगत, उषा केदारी, प्रदीप क्षीरसागर, संजय चौधरी, संजय भगत, सोनाली चौधरी. राजेंद्र दळवी. विजय क्षीरसागर, प्रतिभा शिंदे, राजेश्वरी चिंचकर आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला. धनंजय वाठारकर यांचे विशेष सहकार्य केले. पुणे जिल्हा उपाध्यक्ष संजय भगत यांन आभार मानले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade