अकोले तालुक्यातील युवा उद्योजक तुषार ओंकार दिवटे यांच्या विवाह सोहळ्यात तिळवण तेली समाजातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने खर्चाला फाटा देऊन तिळवण तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून समाजापुढे नवीन आदर्श निर्माण केला.
अकोले तालुका तिळवण तेली समाजअकोले यांच्या वतीने आज गुणवंत विद्यार्थी सत्कार अकोले तालुक्यातील युवा उद्योजक तुषार ओंकार दिवटे व यशश्री राजेंद्र बागुल या नवदाम्पत्यांच्या विवाह सोहळ्यात श्रीमंत मंगल कार्यालय अकोले येथे आयोजित करण्यात आला होता. कमलादेवी तेली समाजबांधव अकोले यांनी शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी व रोख पारितोषिक देऊन मान्यवर पाहण्याचे हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात अवधूत संतोष पन्हाळे, नंदिनी शिवाजी रत्नपारखी यांना १२ वी मध्ये विशेष गुण मिळाल्याबद्दल तर समृद्धी किरण कर्प, हर्षदा संजय दिवटे,प्रतीक्षा नवनाथ पन्हाळे, यश सचिन दिवटे यांचा १० वी मध्ये विशेष गुणवत्ता मिळविले बद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी अहमदनगर जिल्हा तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष अॅड.विक्रांत वाघचौरे शिर्डी, प्रभाकर जाधव नाशिक, विलास पवार नाशिक, निवृत्ती कर्डीले, जयवंत दिवटे पुणे, बाळासाहेब वालझाडे घोटी, जिल्हा सह प्रसिद्धी प्रमुख शशिकांत महाले यांचे हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले गुणवंत सत्कार कार्यक्रमात जिल्हा समाज जिल्हाध्यक्ष अॅड. विक्रांत वाघचौरे यांनी विद्यार्थी हेच उञ्चल भारताचे भविष्य असून हीच तरुण पिढी भविष्यात तेली समाजाचे नाव मोठे करेल असे म्हटले. समाज संघटन कार्यात नेहमीच सहभाग घेणारे दिवटे कुटुंबातील तुषार दिवटे यांचे विवाह सोहळ्यात झालेल्या या सत्कार कार्यक्रमासाठी राजेंद्र दिवटे व दिवटे परिवार, कर्पे, पन्हाळे, शिंदे, वालझाडे, रत्नपारखी, वैभव सत्यवान फल्ले व समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले. आभार किरण कर्पे यांनी मानले.
विशेष मान्यवर व उपस्थित सर्व समाज बांधवांनी नवं दाम्पत्यास शुभ आशीर्वाद देऊन गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराबाबत कौतुक केले.