सातारा शहराजवळ अरफळ नावाचे गाव आहे. या ठिकाणी काळोजी महाराजांनी समाधी घेतली आहे. अनेक दशके या ठिकाणी छोट्या प्रमाणात समाधी दिन साजरा होत होता. परंतु सातारा जिल्हा समस्त तेली समाज या संस्थेने त्यात लक्ष दिले आणि दर वर्षी जिल्हा स्तरावर समाधी सोहळा संपन्न होत आसते. या साठी संस्थेचे पदाधीकारी व मार्गदर्शक श्री जयसिंगराव दळवी लक्ष देतात. आरफळ जवळ जरंडेश्वर डोंगरावर हनुमानाचे मंदिर आहे. जरंडेश्वर परिसरातील गावात काळोजी जन्मले. घरात धार्मीक वातावरण परंतु लग्ना नंतर संसार संभाळताना त्यांना असाध्य आजाराने पछाडले. ते कुणाला न सांगता घर सोडून जरंडेश्वर डोंगरावर आले. या ठिकाणी असलेल्या हनुमानाची भक्ती करीत होते. जेवणासाठी डोगरावर काहीच नव्हते. होती फक्त काटेरी वनस्पती या वनस्पतीची पाने खाऊन ते जगत होते हनुमानाची सेवा करीत होते आत्मीक चिंतन करीत होते यातून त्यांचा असाध्य रोग कधी बरा झाला हे त्यांना समजले सुद्धा नाही. त्यांना तप साधनेने एक छोटे शेपुट ही निर्माण झाले होते आसे जाणकार सांगतात. रोग बरा झाल्या नंतर त्यांना घरी नेहण्यास लोक आले परंतु त्यांनी घरी न जाता परिसरात हनमान भक्ती व अध्यात्माचा प्रसार केला. व जरंडेश्वर डोंगराच्या सानिध्यात असलेल्या अरफळ येथे समाधी घेतली.