धुळे - येथील खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या तेली समाज जनजागरण यात्रेच्या दौऱ्यामध्ये आज फागणे ता.जि. धुळे या ठिकाणी धुळे तालुका संघटक बब्लुभाऊ (काशिनाथ )चौधरी यांनी बैठकीचे आयोजन केलेले होते.
ग्रामपंचायत कार्यालय मध्ये झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी फागणे येथील लोकनियुक्त माजी सरपंच श्री विलास अण्णा चौधरी हे होते. व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रवींद्र जयराम चौधरी ,धुळे शहराध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी, चंद्रकांत श्रीराम चौधरी, अमोल हिरामण चौधरी ,गजेंद्र फुलचंद चौधरी व मान्यवर उपस्थित होते. यावेळी फागणे गावातील तेली समाजाचे अनेक ज्येष्ठ नागरिक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांना मार्गदर्शन करताना मंडळाचे सचिव रवींद्र चौधरी यांनी समाजातील तरुणांनी व महिलांनी जनजागृतीसाठी पुढे येऊन समाज प्रबोधन करावे असे आवाहन केले. अध्यक्ष कैलास आधार चौधरी यांनी तरुणच समाजातील अनिष्टा प्रथा मिटवू शकतात व समाजाचा विकास करू शकतात असे सांगितले.यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना विलास अण्णा चौधरी यांनी सर्व समाजाने एकत्र येऊन संघटित होऊन काम केले तर समाजाचा विकास होईल. तरुणांनी विशेष करून एकत्र येण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना रवींद्र चौधरी म्हणाले की, समाज प्रबोधनांमध्ये महिलांनी अधिक सक्रिय झाले पाहिजे. महिला सक्रिय झाल्या तर समाजाचा विकास होऊ शकतो व लोकांसाठी येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात असे त्यांनी सांगितले.
यावेळी वधु वर परिचय मेळाव्याचे फॉर्म वाटप करण्यात येऊन ,गुणगौरव सोहळ्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली नावे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले. फागणे गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक व युवक कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते.