सातारा शहरात मध्यवस्तीत मल्हार पेठ मध्ये पिड्यान पिड्या तेली समाजाचे बांधव वास्तव्य करुन आहेत. या ठिकाणी शास्त्री कॉलेज समोर गंजलेल्या पत्र्याच्या शेडखाली तेली बाबांची समाधी होती. आज समाधी स्थळ उत्कष्ट झाले आहे. या परसरातील समाजाचे बांधव इतर भक्तांकडे चौकशी केली परंतू ते एक तेली होते या पेक्षा जास्त माहिती मिळ नाही. एस.पी. उबाळे यांनी एक स्मरणीका दिली त्यावरून समजले त एक सिद्धी जानणारे ग्रहस्थ होते. मोठे पण शिष्य परंपरा या पासुन ते दुर होत. यांचे नाव ही त्यांनी कुणाला सांगीतले नवहते. मग कोणत्या गावाचे हे दूरच आहे. बाबांनी आपल्या अध्यात्मीक जोरावर अनेक बाबी सिद्ध केल्या होत्या. एक दर्शक बाबा म्हणुन अनेक जण सांगतात. त्यांचा जो प्रसिद्ध फोटो आहे त्यावरून हे तेली बाबा हे महाराष्ट्रातील नसावेत कारण त्यांचा फेटो साक्ष देतो. बाबांचे लग्न झाले नव्हते त्यामुळेनाती गोती नाहित. फक्त तेली बाबा ही ओळख तेली समाजा पेक्षा इतर समाजाने त्यांना आपले मानले आहे याची साक्ष त्यांची समाधी स्थळ जवळ मिळते.