मालेगाव महानगर तेली समाज आयोजित विद्यार्थी गुणगौरव व राष्ट्रगौरव माजी व आजी सैनिक सत्कार सोहळ्या प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शिक्षणाच्या व्यतिरिक्त प्रत्येक विद्याथ्याने आपली पर्सनलिटी ओव्हर ऑल विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असावे. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष न करता शिक्षकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे त्यासाठी कॅटलिस्टचा रोल निभावणे गरजेचे आहे. शिक्षकांपेक्षा सुद्धा पालकांचा रोल अति महत्त्वाचा असतो त्यामुळे आपल्या पालकत्वाचा योग्य उपयोग करून आपल्या मुलांना व्यवस्थित प्रगतीच्या दिशेने सुद्धा पालकांची जबाबदारी आहे.
आर्थिक उन्नती झाल्याशिवाय विद्यार्थ्यांची पालकाची आणि कुटुंबाची व समाजाची प्रगती होत नाही त्यामुळे आर्थिक उन्नतीकडे जास्त लक्ष द्यावे. माजी आजी सैनिकांना उद्देशून ते असे म्हणाले की,डिफेन्स मधील रिटायर झालेले सर्वजण औद्योगिक प्रगतीमध्ये खूप चांगले काम करतात आणि करू पण शकतात फक्त त्यांच्या ज्ञानाचा उपयोग उपयोग इंडस्ट्रीज ने सुद्धा करून घेण्याची गरज आहे. डिफेन्स मधून रिटायर झालेले सर्व अधिकारी आपल्या राष्ट्र उन्नतीसाठी खूप महत्त्वाचा दुवा आहे त्यांना सरकारने दुर्लक्षित करणे चुकीचे आहे त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आपल्या समाजातील प्रत्येक घटकाचा विकास घडविण्यामध्ये होऊ शकतो असा ठाम विश्वास आहे त्याकरिता डिफेन्सच्या प्रत्येका कडून उपयोग करून घ्यावा. याप्रसंगी १० वी व १२ च्या ८० टक्के वरील मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व समती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी १९७१ च्या युद्धात विशेष कामगिरी करणाऱ्या धोंडू वामन चित्ते यांना व समाजात वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या राजेंद्र सखाराम चौधरी यांचा सन्मानपात्र देऊन गौरविण्यात आले.
आजी व माजी सैनिकांना सन्मानपत्र व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ज्ञानेश्वर बत्तीसे यांनीही स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन केले. समारंभाच्या अध्यक्षपदी रमेश उचित होते.मंचावर अशोक बेता ळ, व महिलाध्यक्ष्या सौ.अरुणा चौधरी होत्या. कार्यक्रमास दगा वाल्मिक चौधरी, तुळशिराम वामन वेताळ, अँड.कृष्णा विठ्ठल पवार, अंबादास रघुनाथ चौधरी, अशोक विश्वनाथ निकम, निवृत्ती तुकाराम चौधरी, भालचंद्र वामन नेरकर, राजेंद्र किसन चौधरी, संजय पोपट उचित, बाळासाहेब पांडुरंग चौधरी, दिपक हरीलाल गुप्ता, कमलाकर सुपडू चौधरी, प्रा. देवेंद्र भिकाजी सोनवणे, गोविंद नामदेव करपे, निलेश बाबुलाल रोकडे, निवृत्ती बागुल इ. उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी बद्रीनाथ सुभाष चौधरी, माणिक देवीदास निकम, कमलेश वामन सुर्यवंशी, मोहन सुपडु पवार, अशोक भिका सूर्यवंशी, राजेश गणेश बडवणे, हेमंत लक्ष्मण कडीले, गणेश काळु रोकडे, रमाकांत एकनाथ जाधव, ताराचंद लक्ष्मण वेताळ, किरण चंद्रकांत चौधरी, दिपक मधुकर चौधरी, पंकज राजेंद्र, चौधरी मोहनलाल चौधरी अमोल चौधरी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास तेली समाजबांधव महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक किशोर सखाराम चौधरी यांनी केले. मधुकर अशोक गायकवाड यांनी आभार मानले.