मुंबई तेली समाजा नेते तथा विधान परिषद सदस्य श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांची भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्या नंतर प्रथमच त्यांचे देशाची आर्थिक राजधानी व स्वप्नांचं शहर मुंबईत आगमन झाले. या प्रसंगी त्यांचे तेली सेनेच्या वतीने तेली समाजाचा नेते मा.श्री.अनिल मकरिये यांच्या नेतृत्वात व गणेश पवार यांच्या पुढाकाराने मुंबई विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपाच्या महत्त्वाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल तेली समाजा मध्ये आनंदाचे वातावरण असून याच अनुषंगाने त्यांचे महाराष्ट्राच्या राजधानीत स्वागत केले या वेळी तेली समाज जिंदाबाद संत जगनाडे महाराज की जय अशा घोषणा देऊन आनंद साजरा करण्यात आला. या वेळी गणेश पवार,अनिल क्षीरसागर, सुनिल क्षीरसागर, श्रीराम कोरडे, सुनिल सुरसे ,कृष्णा लोखंडे आदींची उपस्थिती होती.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade