बुलढाणा खामगाव - येथून जवळच असलेल्या वाडी येथील सौभाग्य लॉनमध्ये २० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच पंचमंडळाचे अध्यक्ष राजेश झापर्डे, सचिव गणेश खेडकर, खामगाव तालुका तेली समाज महिला मंडळ अध्यक्ष सौ. नंदाताई सोनटक्के, सचिव अर्चनाताई जामोदे, जिल्हाध्यक्ष सुलोचनाताई सुलताने, बुलढाणा दक्षिण जिल्हाध्यक्ष सुषमा राऊत, विष्णुपंत पाखरे, प्रमुख पाहुणे म्हणून आ. संजय कुटे, आ. आकाशदादा फुडकर, आ. श्वेताताई महाले तसेच सत्कारमूर्ती चंद्रशेखरजी बावनकुळे उपस्थित होते. यावेळी दहावी व बारावीमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना विजय चोपडे उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग यांच्या आई तुळसाबाई राजाभाऊ चोपडे व वडील राजाभाऊ पुंडलिक चोपडे यांच्या स्मृतीपित्त्यर्थ पारितोषिक व स्मृतीचिन्ह देण्यात आले.
तसेच बारावीमध्ये प्रथम क्रमांक श्रद्धा निवृत्ती चोपडे, द्वितीय क्रमांक साक्षी निलेश दिपके व पोर्णिमा सुनील खेडकर. दहावीमध्ये प्रथम क्रमांक प्रज्वल जानराव रोठे, द्वितीय क्रमांक ओम श्रीकृष्ण रायपुरे, सोबतच पंचायत समिती प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था शेगाव अध्यक्षपदी दीपक अकोटकर व ग्रामसभा सहकारी संस्था मर्यादित पिंप्री गवळी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गजाननराव भोबळे यांचाही सत्कार करण्यात आला.
मनुष्याकडे जीवनात अनेकांचे ऋण असते. ज्या कुटुंबात आपण वाढतो त्या कुटुंबाचे ऋण आणि ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे ऋण आपण फेडलेच पाहिजे, असे आवाहनही विद्यार्थ्यांना यावेळी करण्यात आले.
यावेळी विभागीय सचिव रमेश आकोटकर, गजानन नवथळे, विजय चोपडे, सुनील जामोदे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी एकूण ५० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष नंदकिशोर काथोके, नांदुरा येथील बंडू राठोड, शेगाव पंच मंडळ बुलढाणा अध्यक्ष प्रवीण भिसे, मलकापूर पंच मंडळ, जळगाव पंच मंडळ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निळकंठ सोनटक्के व सौ. अर्चनाताई जामोदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जयेश भिसे, निळकंठ सोनटक्के, विजय अकोटकार, विजय चोपडे, गोपाल खेडकर, रामेश्वर फाटे, विनोद वरुडकर, मधुकर जी बेलोकार, सागर खेडकर, सौ. अर्चनाताई जामोदे व समस्त महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला तेली समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होता.