मालेगाव महानगर तेली समाजातर्फे आयोजित सभेत अध्यक्ष पदावरून रमेश उचित बोलत होते. यावेळी खालील विषयावर चर्चा झाली.
१. मालेगाव तेली समाज एकसंघ राहावा यासाठी प्रयत्न करणे. २. समाजातील समस्या निवारणासाठी प्रयत्न करणे. ३. महिला संघटन मजबूत करणे. ४. विद्यार्थी व युवक प्रबोधनासाठी प्रयत्न करणे. ५. समाजबांधवांसाठी रोजगार व आर्थिक सुबत्ता यावी म्हणून प्रयत्न करावेत. ६. ग्रामीण भागात संपर्क दौरे आखून समाजबांधवांशी संवाद साधणे.
या सभेत खालील पदाधिकारी निवडण्यात आले. तंटामुक्ती अध्यक्षपदी किशोर सखाराम चौधरी तर मालेगाव तालुका तेली समाज अध्यक्षपदी रमेश रामचंद्र चौधरी यांची निवड करण्यात आली. तसेच सामाजिक प्रबोधन व विचार मंच अध्यक्षपदी बाळासाहेब चौधरी यांची निवड करण्यात आली.
मालेगाव महानगर तेली व तालुका तेली समाजातर्फे वरील सर्व पदाधिका-यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
यावेळी, हरिप्रसाद गुप्ता, प्रभाकर व्यवहारे, राजेंद्र सैंदाणे, किशोर चौधरी, बाळासाहेब चौधरी, संजय उचित, मोहनलाल चौधरी, मधुकर गायकवाड, गोकुळ चौधरी व मोतीलाल जाधव यांनी सभेला मार्गदर्शन केले. बैठकीस सचिव दगा चौधरी, अशोक सुर्यवंशी, राजेश बडवणे, हेमंत कर्डिले, तुळशीराम वेताळ, गणेश रोकडे, रमाकांत जाधव, ताराचंद वेताळ, भालचंद्र नेरकर, प्रा. प्रमोद / पीेके चौधरी, हिरालाल चौधरी, कमलाकर चौधरी, माणिक चौधरी, आबा बागूल, बद्रीनाथ चौधरी, संदीप चौधरी, गोविंद करपे, किरण चौधरी, दिपक चौधरी, पंकज चौधरी, निलेश रोकडे, हरीश चौधरी, इ. उपस्थित होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी रमेश उचित होते. सूत्रसंचालन अशोक वेताळ यांनी केले. आभार मोहन पवार यांनी मानले.