औरंगाबाद ; मराठवाड्याची राजधानी आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) शहरामध्ये तेली समाजाच्या तेली सेनेच्या वतीने राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा रविवार दि.२७ नोव्हेंबर, २०२२ रोजी संपन्न होणार आहे. या मेळाव्याच्या अनुषंगाने विवाह इच्छुक वधू-वरांची थेट संवाद साधून त्यांची नोंदणी करून घेण्यात येणार आहे.
'लग्नगाठ' वधू-वर परिचय मेळाव्याची काही खास वैशिष्टये:
तेली समाज वधू -वर परिचय 'लग्नगाठ' ही पुस्तिका डिजिटल आणि प्रिंटेड माध्यमात उपलब्ध होणार आहे.दर तीन महिन्यानी ही पुस्तिका ऑनलाइन अपडेट होत राहील,नोंदणी झालेल्या इच्छुक वधू-वरांना त्यांचा विवाह होईपर्यंत ' लग्नगाठ'च्या माध्यमातून अपेक्षेनुसार स्थळे सुचविली जाणार आहेत, विशेष म्हणजे पारंपारिक वधू- वर मेळावे आणि या मेळाव्यात फार फरक आहे तेली समाज बांधवांना अपेक्षित असलेला मेळावा आहे . या मेळाव्यामध्ये समाज बांधवांना येण्यासाठी म्हणजे प्रवेश शुल्क वगैरे फी आकारली जाणार नाही. सर्व सुविधा निःशुल्क असतील नाव व नोंदणी ही निःशुल्क आहे.पुस्तिका छपाई म्हणून केवळ ५०० रुपये घेतले जाणार आहेत.
ज्यांना शुभेच्छारूपी जाहिरात द्यायची इच्छा असेल ते समाज बांधव जाहिरात देऊ शकतात.ज्या समाज बांधवांना मेळाव्यासाठी अन्नदान करण्याची इच्छा असेल व कार्यक्रमाला लागणाऱ्या वस्तूंची पूर्तता म्हणजे मदत करण्याची इच्छा असेल तर त्यांना ती करता येईल; परंतु यासाठी रोख रक्कम घेतली जाणार नाही. दानशूरांना त्या - त्या साहित्यांची पूर्तता स्वतः करून द्यावी लागेल . ज्या जिल्हयांमध्ये समाजाचे इतर काही संस्थाच्या वतीने वधू - वर परिचय व वधू-वर मेळाव्याचे आयोजन केले असेल व त्यांची तारिख घोषित झालेली असेल तर त्या जिल्ल्यांमध्ये आमच्या वतीने 'लग्रगाठ' ही वधू -वर नोंदणी मोहिम राबवणार नाही संबंधित नियोजित परिचय मेळावे झाल्यावर त्या-त्या जिल्ह्यांमध्ये आम्ही 'लागाठ' च्या वतीने वधू-वरांची नोंदणी मोहीम सुरू करत .
'लग्रगाठ' मेळाव्यामध्ये येणाऱ्या सर्व इच्छुक वधू - वर, पालक, समाजसेवक बंधू-भगिनिंसाठी चहा, पाणी, नाश्ता, जेवण मोफत देण्यात येणार आहे.त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही, तसेच मुक्कामी येणाऱ्या वधू - वर आणि त्यांच्या परिवारातील काही मोजक्या व्यक्तींच्या राहण्याची व्यवस्था आमच्या तर्फे करण्यात येईल, अशी माहिती 'लग्रगाठ' चे मुख्य संयोजक व संपादक श्री. गणेश पवार यांनी दिली आहे. वधू-वरांच्या फॉर्ममध्ये संपर्क कार्यालयाचा पत्ता व कार्यक्रमाची आयोजन समिती आणि प्रमुख संबंधित सवींचे नावे, मोबाईल नंबर दिलेले आहेत.समाज बंधू - भगिनी व पदाधिकाऱ्यांनी हा लग्नगाठ मेळावा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे ही नम विनंती करण्यात आलेली आहे. सदरील अधिक माहितीसाठी गणेश पवार ( ९९२२२३४६२१) यावर संपर्क साधावा.