(चाल - ॐ जय जगदीश हरे)
ॐ जय संताजी नाथा । स्वामी जय संताजी नाथा ।
उजळूनी भक्ती दिपक । करू आरती आता ॥
ॐ जय संताजी नाथा ॥धृ॥
करून निगृण भक्ती । ब्रह्मपद मिळविले । स्वामी ब्रम्हपद मिळविले ।
सांभाळूनि गाथेसी । संकटी रक्षियेले
ॐ जय संताजी नाथा ॥1॥
आग्नी दिव्य दानदा आले । त्रास सहन केला । स्वामी त्रास सहन केला ॥
त्यातुन पार पाडनी । अनमोल ठेवा दिला ॥
ॐ जय संताजी नाथा ॥2॥
अंतसमयी समाधीस । श्री तुकोबा आले । स्वामी श्री तुकोबा आले ॥
तीन मुठी, मुठमाती देऊनी । समाधीस पुर्ण केले ॥
ॐ जय संताजी नाथा ॥3॥
आश्रय तुमचा लाभो । लक्षावधी भक्ता । स्वामी लक्षावधी भक्ता ॥
रात्रंदिन तुम्ही नाथा ॥ भक्तांच्या चित्ता ॥
ॐ जय संताजी नाथा ॥4॥
मधुकरास तव चरणी त्व पदरी घ्याव । स्वामी त्व पदरी घ्यावे ॥
लेकू तुचे नाथा । मोक्षपदी न्यावे. स्वामी मोक्षपदी न्यावे ॥
ॐ जय संताजी नाथा ॥5॥
जय संताजी नाथा । स्वामी जय संताजी नाथा ॥
उजळुनी भक्त दिपक । करू आरती आता ॥
ॐ जय संताजी नाथा ॥धृ.......॥