दि ७/९/२०२२ रोजी श्री क्षेत्र देहू गाव जि. पुणे गावातील प्रवेशद्वार स्वागतकमान २०१७ साली उभारण्यात आली होती संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि त्यांच्या सोबत असलेल्या १४ टाळकरी यांची भक्तांना व वारकऱ्यांना कायम आठवण राहील अशी सुंदर व भव्यदिव्य स्वागत कमान उभारण्यात आली होती परंतु श्री संत तुकाराम महाराज यांच्या १४ टाळकऱ्यां पैकी तेली समाजाचा मान बिंदू तसेच तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचे मूर्ती व नाव यांचा समावेश करणे अनावधानाने राहून गेले, काही समाज बांधवांनी यापूर्वी ही बाब श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या व ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिली परंतु याकडे कोणीही लक्ष दिले नाही तसेच पाठपुरावा अभावी ही मागणी अपूर्ण राहिली होती.
हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय राहाता तालुक्यातील शिर्डी येथील तेली समाज बांधवांच्या लक्षात आली व त्याप्रमाणे या प्रश्नाचा पाठपुरावा करून पुणे येथील तेली समाजाचे सामाजिक कार्यकर्ते अनिल राऊत यांच्या मदतीने आज दि ७/९/२०२२ रोजी देहू गावात जाऊन प्रत्यक्षात स्वागत कमानीचे निरिक्षण केले.
श्री संत तुकाराम देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ यांच्या बरोबर सकारात्मक चर्चा केली व त्यांना निवेदन सादर करण्यात आले होते यामध्ये अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा या संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड.विक्रांत वाघचौरे , जिल्हा निरीक्षक बद्रीनाथ लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश नागले, जिल्हा कोअर कमिटी सदस्य सुधाकर बनसोडे व सुदाम शेजवळ या पदाधिकारी यांनी नाव फलकात बदल करण्यात यावा यासाठी प्रयत्न केले ती मागणी श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने चूक लक्ष्यात घेऊन त्वरित मान्य केली.
त्याप्रमाणे अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा या संस्थेच्या माध्यमातून त्वरित निधी उपलब्ध करून देण्यात आला, त्याप्रमाणे स्वखर्चाने हभप श्री संताजी जगनाडे महाराज ( संतू तेली ) नावाचा मार्बल ग्रेनाईट शिला फलक तयार करून तो कायम स्वरूपात बसवण्यात यावा यासाठी लगेचच श्री आळंदी देवाची या गावी जाऊन सुमारे १३,५००/- रुपये किंमतीची मार्बल ग्रॅनाइट शिलाफलक तयार करण्यात आला, परंतु रात्री उशिरापर्यंत पावसाने हजेरी लावल्याने कामात अडथळा आला परंतु दोन साधर्म्य असलेल्या नावाचा संशोधन करून शोध घेतला व श्री संताजी महाराज जगनाडे तेली यांच्या नावाचा व मूर्तीचा स्वागतकमानीवर समावेश व्हावा त्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी समस्त देहू ग्रामस्थ व संस्थान समितीच्या उपस्थितीत नवीन मार्बल ग्रॅनाइट ची शिला फलक बसवण्यात आला व दरम्यानच्या काळात अपूर्ण राहिलेले हे काम यशस्वीपणे पूर्णत्वास नेले.
संत हे कोणत्याही एका विशिष्ट जातीसाठी कार्य करत नसतात. परंतु ज्या कुळात संतांचा जन्म झाला त्या कुळातील जातीला तो अभिमान असतो तेच काम आज राहाता तालुक्यातील समाज बांधवांनी प्रत्यक्ष करून दाखवले. यामध्ये अहमदनगर जिल्हा तेली समाज संस्थेचे अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष श्री.अॅड.विक्रांत वाघचौरे, श्री बद्रीनाथ लोखंडे, खजिनदार व विश्वस्त, श्री सुरेश नागले जिल्हा उपाध्यक्ष, श्री.सुधाकर बनसोडे जेष्ठ मार्गदर्शक श्री.सुदाम शेजूळ जेष्ठ मार्गदर्शक यांनी यामध्ये सहभाग घेतला यावेळी समस्त देहू गाव ग्रामस्थ , श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू अध्यक्ष श्री नितिन महाराज मोरे, श्री प्रल्हाद मोरे माजी अध्यक्ष, श्री रामभाऊ मोरे विश्वस्त, श्री संजय मोरे विश्वस्त, श्री पंढरीनाथ मोरे विश्वस्त, भवानी नगर साखर कारखाना संचालक श्री गणेशकुमार झगडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले यावेळी समस्त देहूगाव ग्रामस्थ, संत तुकाराम महाराज संस्थान विश्वस्त मंडळ मोठया संख्येने उपस्थित होते.