पुणे जिल्हा संताजी सेना महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेत विलीन
पुणे प्रतिनिधी :- गेली दोन वर्षे पुणे शहर व जिल्ह्यात समाजासाठी विविध उपक्रम राबविणार्या पुणे जिल्हा संताजी सेनेचे महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेत (पुणे विभाग) विलीनीकरण करण्यात आले.
संताजी सेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश भोज यांनी आपल्या सर्व सहकार्यांसह महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेत प्रवेश केला व इथून पुढे महासभेच्या तत्वाप्रणालीनुसार व मार्गदर्शनाखाली समाज कामे चालू ठेवण्याची ग्वाही दिली. जय भवानी टेकिनकल इन्स्टिट्युट, बिंबवेवाडी येथे संताजी सेनेच व महासभेचे पदाधिकारी यांची संयुकत बैठक होऊन वरील निर्णय घेण्यात आला. महासभेचे प्रदेशाध्यक्ष खा. रामदासजी तडस, कार्याध्यक्ष अशोक काका व्यवहारे, महासचिव डॉ. भूषण कर्डिल यांच्या आदेशानुसार खालीलप्रमाणे पदांच्या नियुक्तिपत्राचे वाटप करण्यात आले.
दिलीप चौधरी प्रांतिक प्रसिद्धी प्रमुख, सुभाष पन्हाळे प्रांतिक संघटक, विजय रत्नपारखी पुणे विभाग अध्यक्ष, चंद्रकांत व्हावळ, पुणे पश्चिम ग्रामीण जिल्हध्यक्ष यांचे हसते रमेश भोज कार्यध्यक्ष, पुणे विभाग, दिलीप शिंदे सचिव, पुणे विभाग, प्रितम केदारी, युवा अध्यक्ष, पुणे विभाग, संतोष व्हावळ युवा अध्यक्ष, पुणे महानगर, सुर्यकांत बारमुख प्रसिद्धी प्रमुख, पुणे विभाग, गणेश चव्हाण अध्यक्ष दौंड तालुका, श्रीमती राधिका मखामले कार्यध्यक्षा महिला आघाडी, पुणे विभाग , सौ. निशा करपे उपाध्यक्षा महिला आघाडी, पुणे विभाग, सौ. नीलम घाटकर अध्यक्षा महिला आघाडी, पुणे शहर महा नगर याप्रसंगी विजय, चंद्रकांत पन्हाळे , बाळासाहेब अंबिके, रत्नाकर दळवी, माऊली व्हावळ, रमेश डाफे, अनिल उबाळे, हमंत खोंड दत्तात्रय पवार, सचिन नगिने, पोपट गंधाले, दिगंबर डवरी, दिलीप चिलेकर, प्रदिप सायकर, मीरा व्हावळ, राणी खोंड , सुलोचना लोखंडे , कमल सुपेकर, ललीता मांजरेकर, कल्पना उनवणे, सीमा पवार, कमल सुपेकर , ललीता मांजरेकर, कल्पना उनवणे, सीमा पवार अरूणा .ताई पवार, जाधवकाका, कमल देशमाने, प्रसाद पवार बाबुराव क्षिरसागर सुरेंद्र हाडके हे उपस्थित होते. दिलीप चौधरी, सुभाष पन्हाळे, शिवय रत्नपारख, चंद्रकांत व्हावळ सचिन नगिने, दिगंबर डवरी, यांनी मार्गदर्शन केले.
आपापसतील हेवेदावे व अहम विसरून एकमेकांच्या सहकार्याने समाजाच्या हिताची कामे करण्याचा निर्धार करण्यात आला. राधिका मखामले यांनी त्यांच्या कार्यालयात कायमस्वरूपी वधु-वर नोंदणी कार्यलय सुरू करण्याची तयारी दर्शविली. प्रास्ताविक व सुत्रसंचालन रमेश भोज यांनी केले व दिलीप शिंदे यांनी आभार मानले. महालक्ष्मी देवीच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
दिनांक 20-10-2014 21:59:39