कल्पेश बावनकुळेच्या हत्याऱ्यांना ४८ तासांत अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन - संताजी ब्रिगेड व तेली समाज महासभेचा इशारा.

शिवसेना रामटेक माजी खासदार प्रकाश जाधव - संताजी ब्रिगेडची सीसीटीव्ही कॅमरे, पोलिस चौकीची मागणी

    कन्हान - कल्पेश बावनकुळे या युवकाच्या हत्याऱ्यांना ४८ तासांच्या आत अटक करून कन्हान व ग्रामिण भागात रात्रीची गस्त आणि नागपुर बॉयपास महामार्गावरील बोरडा रोड चौकात पोलीस चौकी व सीसीटीव्ही कॅमरे त्वरित लावावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना रामटेक माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांच्या नेतृत्त्वात शिवसेना, संताजी ब्रिगेड, तेली समाज महासभा प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र भुरे व शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांना बुधवारी निवेदनातून दिला आहे.

Arrest the killers of Kalpesh Bawankule within 48 hours otherwise intense agitation - Warning of Santaji Brigade and Teli Samaj Mahasabha   कल्पेश भगवान बावनकुळे, रा. बनपुरी या युवकाची अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्रांनी वार करून निघृण हत्या केली. कल्पेश हा शनिवार १० सप्टेंबरला मध्यरात्री नागपुरवरून कन्हान बोरडा मार्गे बनपुरी येथे घरी परत जातांना त्याचा खून करण्यात आला. घटनेला ८५ तास उलटले. चार दिवस लोटूनही पोलिस आरोपींना अटक करण्यात अपयशी ठरले आहेत. बनपुरी, काद्री-कन्हान व ग्रामिण परिसरात मितीचे दहशतीचे वातावरण आहे. तेली समाज आणि नागरिकांत पोलीस प्रशासनाविरुध्द रोष आहे. कांद्री ते नगरधन रोड,नागपुर बॉयपास मार्गावरील बोरडा रोड चौक ते कन्हान नदी पुलापर्यंत आणि कन्हान शहर व ग्रामिण भागात रात्री ला पोलीस गस्त (पेट्रोलिंग) नियमित वाढवावी, बोरडा चौकात सीसीटीव्ही कॅमेरे व पोलीस चौकी त्वरित सुरू करावी तसेच कल्पेशच्या मारेकयांना ४८ तासात अटक करावी, अन्यथा तेली समाज संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करेल व उद्भवणाऱ्या परिस्थितीला पोलिस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी बागवान यांना निवेदनातून देण्यात आला.

    शिष्टमंडळात माजी खासदार प्रकाश जाधव, प्रेम रोडेकर, दिलीप राईकवार, प्रभाकर बावने, रूपेश सातपुते, पुरुषोत्तम येनेकर, गोविंद जुनघरे, नरेंद्र खडसे, प्रविण गोडे, अनिल ठाकरे, ललूण कुशवाह, मनोज मेश्राम, बल्ला यादव, विजय बोरकर, संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष नरेश भोंदे, रवि घावडे, विजय बावनकुळे, सुरेश पारधी, प्रभाकर सावरकर, नंदु घावडे, प्रमोद देशमुख, शुभम घावडे, विठ्ठल बावनकुळे, दिलिप देशमुख, मोहन धांडे, अनिल बारई, आशिष बावनकुळे, नितीन लेंडे आदी उपस्थित होते.

   दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी बागवान यांनी रात्रीची गस्त आजपासून सुरू करण्याची हमी दिली तसेच बोरडाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि चौकी सुरू करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल आणि कल्पेशच्या हत्याऱ्यांना लवकरात लवकर शोध करून अटक करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

दिनांक 19-09-2022 02:54:46
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in