वर्धा, दि. १८ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले हे नेहमीच स्वत:ला प्रसिध्दीत ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असतात. आपल्या पेक्षा मोठ्या नेत्यावर कारण नसताना टीका करायची आणि स्वतः करिता प्रसिद्धी मिळवायची हा त्यांचा नेहमीचा उद्योग झालेला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसीनसल्याचेसांगुन त्यांच्या जातीवर सुद्धा वादग्रस्त वक्तव्य करून नाना पटोले यांनी विनाकारण वाद निर्माण केला आहे. त्यांच्या या व्यक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्याकरिता व नाटा पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याबद्दल त्यांनी समस्त ओबीसी तसेच ओबीसी समाजात मुख्य घटक असलेल्या तेली समाजाची दिलगिरी व्यक्त करुन जाहीर माफी मागावी अन्यथा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे सुधीर चाफले, विपीन पिसे, चंद्रकांत चामटकर, किशोर गुजरकर, विजय घवघवे, सुनितातडस, दिपक भुते, गजेन्द्र सुरकार, चंद्रकांत वाघमारे, विशाल उराडे, निलेश वैद्य, पंकज खंगार, वैभव तिजारे, वैभव उगेमुगे, जयश्री घुमकर, धिरज गभने, शार्दुल वांदिले, अश्विन साहु, भुषन पारडकर, महेश हटवार, मयुर उराडे, एकनाथ डहाके, अभिषेक उराडे, वैभव राऊत, दुर्गेश मुडे, संदीप रघाटाटे, बालू माहरे, पंकज वंजारी, दिनेश गोमासे, निलेश कोहळे, सागर झाडे, हरिष पिसे उपस्थित होते.
आपल्या सर्वांना माहीत आहे की, मोदी हे गुजरात राज्यातून मोठे झाले असून ओबीसी समाजात महत्वपूर्ण घटक असलेल्या तेली समाजातून ते येतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीच जाती पाती चे राजकारण केले नाही, ते फक्त विकासाचे राजकारण करतात. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हाच त्यांचा मूलमंत्र राहिलेला आहे व त्याच मूलमंत्रावर ते देशासाठी सतत कार्य करीत असतात. आज काँग्रेस पक्षाचे सर्व मुद्दे संपलेले असून विकासाच्या मुद्यावर ते कुठल्याही प्रकारची बरोबरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत करू शकत नसल्याने प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना बिनबुडाचे नवीन मुद्दे शोधत फिरावे लागत असल्याची प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष व खासदार रामदास तडस यांनी दिली व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा मी निषेध व्यक्त करतोव नाना पटोले यांनी पंतप्रधान महोदयांबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केले आहे त्याबद्दल त्यांनी समस्त ओबीसी तसेच ओबीसी समाजात मुख्य घटक असलेल्या तेली समाजाची दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी केली.