श्री संताजी महाराज जगनाडे आरती
आरती संतू संता स्वामी सदगुरू नाथा सेविती साधू संत ।
पाय दाखवी रंका, आरती संतू संता ॥धृ॥
धरोनी अवतारासी शुद्ध केले मनासी ।
आम्हा लाविले पंथा आरती संतू संता ॥1॥
शडरिपूचा करूनी अंत नाव पावेल संत ।
समजेना तुमच्या अंता आरती संतु संता ॥2॥
< आणोनि तुम्ही मना दाविला देहामाजी घाना ।
आम्हां लाविली चिंता आरती संतु संता ॥3॥
तुकाराम करिता कथा तुम्ही टाळकरी होता ।
ठाऊक सकल जना आरती संतु संता ॥4॥
स्वार्थ प्रपंच करिता तुमचे आठवूनि पंथा ।
दिधले एकादी व्रता आरती संतु संता ॥5॥
आपण समाधीस्त होता जन थकले माती वाहता ।
तुकाराम चिमटी देता तुम्ही पावलेत अंता आरती संतु संता ॥6॥
स्वामी सद्गुरू नाथा सेविती साधू संत ।
पाय दाखवी रंका, आरती संत संता ॥7॥