गेवराई (प्रतिनिधी ) - तेली समाज तेल घाणा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुणे या संस्थेच्या वतीने दि.११सप्टेंबर रोजी रविवार सकाळी ११ वा वीर बाजी पासलकर स्मारक सभागृह पुणे येथे तेली समाजातील तेल घाणा व्यवसाय करणाऱ्या समाज बांधवाचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रोहिदास उबाळे, सम्राट तेली ,कचरू वेळंजकर. किर्वे. निशाताई करपे, नानासाहेब चिलेकर, सचिन काळे, ओंकार एक शिंगे ,किरण घोंगते, मुकेश चौधरी ,आशिश क्षीरसागर यांच्यासह तेली समाजातील मान्यवर उपस्थित होते. गेले दोन ते अडीच वर्षापासून तेली समाज लाकडी तेल घाणा प्रतिष्ठान पुणे ही आपली संस्था वेगवेगळ्या माध्यामातून या क्षेत्रात काम करीत आहेत
प्रतिष्ठानची सुरुवात ३० ऑगस्ट २०२० रोजी पहिले प्रशिक्षण वर्ग घेऊन झाली होती.हा महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील पहिले तेली समाजासाठी तेली समाजातील व्यक्तीने आयोजित केलेले प्रशिक्षण वर्ग होता. यापुढेही सतत न थांबता कार्यरत रहाण्याचा संकल्प आहे, असे आयोजक सुरेंद्र दळवी यांनी सांगितले.तेल घाना उद्योगास नव संजीवनी देण्यासाठी समाजातील सर्व घटकांना प्रोत्साहन देऊन व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रशिक्षण वर्ग व मार्गदर्शन करणे महत्त्वाचे असल्याचे प्रमुख पाहुणे रोहिदास उबाळे यांनी सांगितले. या कार्यक्रमात सुनिल सोनवणे, अशोक मिटकर ,भगवान मिटकर ,सखाराम मिसाळ ,राऊत ताई आदींनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील निवडक लाकडी तेल घाणा व्यवसायातील नव उद्योजक प्रा .राजेंद्र बरकसे (गेवराई ), कैलास टोणपे (गेवराई ), सुनिल सोनवणे ( उमापूर ), विजय लोखंडे ( नेवासा ) गणेश क्षीरसागर ( करमाळा ), अशोक मिटकर ( औरंगाबाद ), सखाराम मिसाळ (जालना) आदींचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन प्रा रोहित तांबे यांनी केले. आभार संतोष माकुडे यांनी मानले. उद्घाटन कार्यक्रमानंतर विशेष चर्चासत्र घेण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नानासाहेब चिलेकर सचिन काळे ओंकार एकशिंगे आशिष क्षीरसागर किरण घोंगते मुकेश चौधरी यांनी परिश्रम घेतले.