दि १२ - तेली समाज तेल घाणा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुणे या संस्थेच्या वतीने दि.११ सप्टेंबर रोजी पुणे येथे तेली समाजातील तेल घाणा व्यवसाय करणाऱ्या समाजातील नवउद्योजकांचा सत्कार करण्यात आला. यात गेवराईतील राजेंद्र बरकसे आणि कैलास टोणपे या दोघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रोहिदास उबाळे, सम्राट तेली , कचरू वेळंजकर, किर्वे, निशाताई करपे, नानासाहेब चिलेकर, सचिन काळे,ओंकार एकशिंगे,किरण घोंगते, मुकेश चौधरी ,आशिश क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती. तेली समाजासाठी तेली समाजातील व्यक्तीने आयोजित केलेले प्रशिक्षण वर्ग होता. यापुढेही सतत न थांबता कार्यरत रहाण्याचा संकल्प असल्याचे आयोजक सुरेंद्र दळवी यांनी सांगितले. तेल घाना उद्योगास नव संजीवनी देण्यासाठी समाजातील सर्व घटकांना प्रोत्साहन देऊन व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रशिक्षण वर्गव मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लाकडी तेल घाणा व्यवसायातील गेवराईतील नवउद्योजक राजेंद्र बरकसे आणि कैलास टोणपे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा रोहित तांबे यांनी केले. आभार संतोष माकुडे यांनी मानले.