सातारा शहरात श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या जीवनावरील 'संतु - तुकाची जोडी लावी नामाची गोडी' भव्य अडीच तासाचा नाट्यप्रयोग शुक्रवार, दि. २१ दुपारी ३ वाजता शाहू कलामंदिर, सातारा येथे होत आहे. श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथा ज्यांच्यामुळे आज जगाला ज्ञान देण्याकरिता उपलब्ध आहेत. त्या गाथा ज्यांनी लिहून काढल्या असे श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या जीवनावरील जिवंत देखावा नाट्यरुपात जनतेला पहावयास मिळणार आहे.
श्री तुकाराम महाराज व श्री संताजी महाराज यांच्या ज्ञानाची जगाला विश्वशांतीकरिता आज गरज आहे. सर्वांनी या नाट्य प्रयोगास सहकुटूंब व मित्रपरिवारासह नाट्य प्रयोग पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन सातारा जिल्हा तेली समाज व सातारा शहर तेली समाजाच्यावतीने करण्यात आले आहे. निर्माता : गुरूसाई प्रॉडक्शन्स् प्रोड्युसर : श्री. सुरेश चौधरी (शिरपूर) संतु - तुकाची जोडी लावी नामाची गोडी डायरेक्टर : श्री. मंगेश दिवाणजी (पुणे) मार्गदर्शक : मा. रजनीताई, मा. स्नेहा अचरणीकर (मुंबई) शुक्रवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजता स्थळ : शाह कलामंदिर, सातारा.