आरती संत संताजी महाराजांची गाणी
आरती संतू संता । चरणी ठेविला माथा ।
साधूवर्ण कृपावंत । अभय देई तत्वता ॥1॥
जन्मोनिया चाकणाशी । धन्य केली पंचक्रोशी ।
शरण तुकयासी जाय । धन्य धन्य देही होय ॥2॥
लोखंड परिसासंगे । सुवर्ण होय सर्व अंगे ।
तोंची झाला संतुराया । आंतर्भाह्य विठ्ठल काया ॥3॥
नामत्रई केली । भक्तीमार्गा चोखळीले ॥
देह वसन होता । चदन लपवी मृतिका ॥4॥
चिंतापडे तव भक्ता । जे जाणी स्वर्गी तुका ।
आण भाकेची आठवण । आले तुका स्वर्गातुन ॥5॥
तीन मुठी मृतिकेने । गेले वदन लपून ।
प्रेम चारीता गोंधन । गेली वचनी गंतून ॥6॥
म्हणूनी झाले येणे । संतू विष्णुलोकी नेणे ।
ऐंसा अभंग लिहून । तुका ठेवी चरणखुण ।
ऐसा तू थोर भक्त । कृष्णा घाली दंडवत ॥7॥