समाजासाठी भूषणावह सामाजिक उपक्रम राबवणारे शांतीदूत कचरू वेळंजकर

तळागाळातील अनेक महिलांचा पुरस्कार देऊन केला सन्मान,ग्रामीण साहित्य संमेलन, नाट्य महोत्सव, महिला कीर्तन महोत्सवातून समाज सेवा

    औरंगाबाद शहर आणि परिसरात गेल्या २५ वर्षापासून आसामाजिक, सांस्कृतिक, व्यावसायिक , धार्मिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात अनेकांगी समाजोपयोगी उपक्रम राबवणारे व्यक्तिमत्व म्हणून कचरू कारभारी वेळंजकर यांनी आगळी ओळख निर्माण केली आहे. महिला दिनाला तळागळातील महिलांना पुरस्कार देणारे, गोर-गरीब मुलांना दरवर्षी सातत्याने शैक्षणिक साहित्याचे वाटप करणारे, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तळमळीच्या १७०० समाजसेवकांचा पुरस्कार देऊन गौरव करणारे, आपल्या मूळ गावी खंडाळा (ता, वैजापूर) येथे मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी स्वत:ची दोन एकर जागा मोफत संस्थेला देणारे, औरंगाबाद शहरात शांतता व सामाजिक सलोखा राहावा यासाठी कायम काम करणारे शांतीदूत म्हणूनही कचरू वेळंजकर यांची ओळख आहे. याशिवाय तेली समाजाच्या उन्नतीसाठी विविधांगी उपक्रम राबवणारे, ओ.बी.सी समाजाच्या प्रगतीसाठी झटणारे, व्यापारी महासंघाच्या माध्यमातून कार्यरत राहणारे, कोरोना काळात गरजवंतांच्या मदतीला धावणारे कचरू वेळंजकर यांना आजबर विविध संस्थांचे महाराष्ट्र भूषण, समाज भूषण, वैजापूर तालुका भूषण, खंडाळा ग्राम भूषण आदी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

खंडाळ्यातील खडतर दिवस

Teli OBC Samaj Shanti Doot Kachru Velanjkar    कचरू बेळंजकर यांचा आजवरचा हा प्रवास अत्यंत खडतर राहिला आहे. या बाबत ते सांगतात, खंडाळा हे आमचे मूळ गाव. गावी आई, वडिल, चार बहिणी आणि मी असे आमचे कुटुंब, घरची परिस्थिती बेताचीच. वडिलोपार्जित शेती होती. वडिल दगड फोडण्याच्या कामावर जायने.मीही त्यांच्या मदतीला जायचो. कधी दोन वेळचे जेवण मिळायचे नाही, चांगले कपडे घालायला नसायचे. अशा परिस्थितीत खंडाळ्यात १० वी पर्यंत शिक्षण घेतले. त्यावेळी वह्या-पुस्तके घेण्याइतकी परिस्थिती नव्हती, शाळेतील मुळेबाई मला त्यांच्या मुलीची पुस्तके द्यायच्या, तर रहीतील कोन्या वह्याच्या कागदांपासून वह्या बनवल्या. मुळे मॅडम माझ्या अभ्यासाकडे लक्ष द्यायच्या. अभ्यासात हुशार होतो. खूप शिकून शिक्षक व्हावे व पुढील पिही घडवावी असे स्वप्न त्यावेळी होते. मात्र गरीब परिस्थितीमुळे दहावीनंतर इच्छा असूनही पुढील शिक्षण घेता आले नाही.

वाचनालयात केले काम

    दहावीनंतर कचरू वेळंजकर यांनी पाच रुपये रोज याप्रमाणे वाचनालयात काम केले. त्याबाबत ते सांगतात,इयत्ता ९वी१०बीचे शिक्षण घेत असताना देविदास अप्पा हे खंडाळ्यात मंडळ निरीक्षक होते, त्यांची मुले माझ्या वर्गात होती. त्यांनी त्यावेळी फार मदत केली. दहावीनंतर खंडाळा येथील शेतकरी वाचनालयात सेवक म्हणून पाच रुपये रोज या प्रमाणे काम केले. यावेळी गोरख सोनवणे यांनी खूप मदत केली. वाचनालयात सेवक म्हणून काम करत असताना खूप वाचन केले. त्याची पुढे आयुष्यात चांगली मदत झाली.

औरंगाबादच्या मिटकर कुटुंबाशी जुळले नाते

     औरंगाबाद येथील प्रसिद्ध तेल व्यावसायिक रामचंद्र मिटकर यांच्या एकुलत्या एक मुलीशी कचरू वेळंजकर यांचा विवाह झाला. कचरू घरजावई म्हणून औरंगाबादेत आले. औरंगाबादेत आल्यानंतर त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न केले, एक - दोन ठिकाणी नोकरी केली. नंतर व्यवसाय करायचा ठरवले. त्या बाबत ते सांगतात, सासऱ्याचे मिटकर तेल भांडार हे प्रसिद्ध दुकान होते, त्यावेळी राज्यभर येथून तेल जायचे. एवढेच नव्हे तर हैदराबादच्या नबाब घराण्यातही मिटकर तेल भांडार येथून तेल जायने, यान तेल भांडारमध्ये सासऱ्याच्या मार्गदर्शनाखाली काम सुरु केले.

तेल व्यवसायाला दिले आधुनिक रूप

    मिटकर तेल भांडारचा व्यवसाय सांभाळत असताना, काळानुरूप बदल केला पाहिजे, हे कचरू वेळंजकर यांनी हेरले. त्यानुसार त्यांनी तेलाच्या फिल्टर मशीन बसवल्या. तेलाचे पॅकिंग करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सुटे तेल नेण्याकडे ग्राहकांचा कल होता. मात्र कवरू बेळंजकर यांनी सर्वप्रथम एक लिटर, पाच लिटर, १५ लिटर असे पॅकिंग करण्याची सुरूवात केली. स्वस्तिक ब्रेड या नावाने ही तेल बिक्री होत असे.

सामाजिक उपक्रमात आघाडी

    व्यवसाय करत असतानाच आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे असे विचार कचरू वेळंजकर यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यातूनच मग त्यांना विविध सामाजिक कार्याला मुरूवात केली, त्यावेळी शेगाव येथील गजाजन महाराजांची पालखी औरंगाबादेत मुक्कामी यायची. त्या पालखीची. त्यातील वारकऱ्यांची स्वखर्चाने संपूर्ण व्यवस्था करण्याचे काम २५ वर्षे मिटकर, तेल भांडारच्या माध्यमातून केले.

शैक्षणिक साहित्याचे वाटप

    कचरू वेळंजकर हे गेल्या २५ वर्षापासून गरीब, अपंग विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करतात. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून मागील २५ वर्षापासून वेळंजकर यांचा शैक्षणिक साहित्य बाटपाचा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे,

ओबीसी संघर्ष समितीत काम

   महाराष्ट्र राज्य ओबीसी जनजागरण संघर्ष समितीचे महासचिव असताना कचक वेळंजकर यांनी पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यासाठी मोठा संघर्ष केला. यासंबंधीच्या समितीचे प्रमुखपद त्यांच्याकडे होते. औरंगाबादेत सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारणीसाठी त्यांनी आंदोलन केले. अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला.

महिला दिनी तळागाळातल्या महिलांचा सन्मान

    आपल्या सामाजिक कार्याविषयी कचरूजी सांगतात, महिलांप्रति सन्मानाची भावना समाजात रुजाबी या हेतून आम्ही ८ मार्च या जागतिक महिला दिनी स्वखर्चाने महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे ठरवले. त्यानुसार सफाई कामगार महिला, कचरा वेचणाऱ्या महिला, कळवण तालुक्यातील आदिवासी महिला अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या १७०० महिलांना महिला दिनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. अनेक मोफत सामुदायिक विवाह सोहळे आजवर आयोजित केल्याचे ते सांगतात.

आदर्श शिक्षक पुरस्काराने शिक्षकांचा गौरव

    कचरू वेळंजकर दरवर्षी पाच शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देतात. यासाठी त्यांची एक टीम आहे. ही टीम राज्यभर फिरून शिक्षकांचे काम पाहते. त्यातून पाच आदर्श शिक्षकांची निवड केली जाते आणि या पाच शिक्षकांना गुणवत्तेच्या जोरावर आदर्श शिक्षक म्हणून निवडण्यात येते. याशिवाय दरवर्षी विविध कलाकारांना कला गौरव पुरस्काराने गौवरण्यात येते,

ग्रामीण साहित्य संमेलन, नवरात्र महोत्सव

    साहित्य आणि वाचनाची आवड असलेले कचरू वेळंजकर यांनी आपल्या मूळ गावी, खंडाळा येथे पहिले ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केले होते. त्याबाबत ते सांगतात, ग्रामीण भागातील दुर्लक्षित साहित्य, साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने २००३ मध्ये खंडाळा (ता. बैजापूर) येथे राज्यातील पहिले ग्रामीण साहित्य संमेलन घेतले. त्या संमेलनाला रा.रं. बोराडे, फ.मु. शिंदे हे उद्घाटक, अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

महिला कीर्तन महोत्सवाचे व ग्रामीण नाट्य स्पर्धा आयोजन

   स्व मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ खंडाळा येथे गेल्या तीन वर्षांपासून कचरू वेळंजकर हे मातोश्री महिला प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय महिला कीर्तन महोत्सवाचे आयोजन करतात. दरवर्षी नवरात्रात हा कीर्तन महोत्सव असतो. त्यात राज्यातील नामांकित महिला कीर्तनकार कीर्तन सादर करतात. याशिवाय गेल्या नऊ वर्षांपासून नवरात्र उत्सवात स्व, बाळासाहेब ठाकरे ग्रामीण नाट्य स्पर्धेचे आयोजन यशस्वीपणे सुरू आहे.

सामाजिक सलोखा राखण्यात पुढाकार

    चेलीपुरा भागात वास्तव्यास असलेले कचरू वेळंजकर सातत्याने सामाजिक सलोख्यासाठी सक्रीय सहभागी असतात, चेलीपुरा व्यापारी महासंघाचे ते अनेक वर्षे अध्यक्ष आहेत. कोरोनाचे संकट असो की धार्मिक तणाव असो सर्वांच्या मदतीला धावून जात, शासनाच्या शांतता कमिटीच्या माध्यातून ताण-तणाव वाढणार नाही या साठी ते सातत्याने पुढाकार घेतात.

नातीच्या जन्माचे स्वागत रेड कार्पेटवरून

    कचरू वेळंजकर यांना दोन मुले, एक मुलगी आहे. दोन्ही मुले व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा आनंद आणि सून सायली यांच्या पोटी मुलगी जन्माला आली, तेव्हा आपल्या नातीचे स्वागत त्यांनी वाजत गाजत केले. चेलीपुरा येथील गणेश मंदिरापासून ते निवासस्थानापर्यंच्या शंभर मीटर अंतराच्या रस्त्यावर रेड कार्पेट अंथरून, बँड, तुतारीच्या संगतीने वाजतगाजत, छत्रीच्या सावलीत, फुलांची उधळण करत वेळंजकर कुटुंबियांनी आपल्या नाताचे स्वागत केले. या कृतीतून वेळंजकर कुटुंबाने बेटी बचाओचा संदेश समाजाला दिला.

कुटुंबियांच्या वाढदिवसाचा खर्च समाजकार्यासाठी

    वेळंजकर कुटुंबातील सदस्य आपले. वाढदिवस धूमधडाक्यात साजरे न करता,त्यासाठी येणारा खर्च अपंग, निराधार, गरीबांसाठी देतात. रामचंद्र मिटकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तेली समाजातील गणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रात काम करणारे प्रतिभावंत यांना पुरस्कार देण्यात येतो. आजवर ५१ जणांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

ओबीसी समाज व तेली समाजासाठी सातत्याने काम

   कचरू वेळंजकर सातत्याने ओबीसी समाज व तेली समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत असतात. त्यांनी आजवर अनेक संघटना, समित्यांत काम पाहिले आहे. अनेक समिती, संघटनात ते अध्यक्ष, कार्याध्यक्ष, प्रमुख म्हणून अनेक जबाबदारी, काम पाहताहेत. कचरू वेळंजकर कार्यरत असलेल्या काही संघटना : • महाराष्ट्र राज्य ओबीसी जनजागरण संघर्ष
समिती, • औरंगाबाद व्यापारी महासंघ, • औरंगाबाद जिल्हा खाद्यतेल व्यापारी महासंघ, • औरंगाबाद जिल्हा तेली महासंघ, • महाराष्ट्र राज्य तेली समाज सेवा आघाडीचे
कार्याध्यक्ष, • चेलीपुरा व्यापारी संघटना

दिनांक 16-11-2022 07:04:23
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in